Home मराठवाडा शाळा बंद करणारा15 मार्च 2024 चा संचमान्यतेचा अन्यायकारक निर्णय रद्द करावा- मराठवाडा...

शाळा बंद करणारा15 मार्च 2024 चा संचमान्यतेचा अन्यायकारक निर्णय रद्द करावा- मराठवाडा शिक्षक संघाचे निवेदन.

130

आशाताई बच्छाव

1001508179.jpg

शाळा बंद करणारा15 मार्च 2024 चा संचमान्यतेचा अन्यायकारक निर्णय रद्द करावा- मराठवाडा शिक्षक संघाचे निवेदन.
प्रतिनिधी जालना -वसंतराव देशमुख
दिनांक १५/०५/२०२५
15 मार्च 2024 च्या संच मान्यतेच्या शासनादेशामुळे शाळा बंद पडत असून त्यामुळे गोरगरीबांना शिक्षणाची दारे बंद होणार आहेत. सामान्य माणसाच्या शिक्षणाच्या नरडीला नख लावणारा अन्यायकारक शासनादेश रद्द करावा अशी मागणी मराठवाडा शिक्षक संघाचे अध्यक्ष सूर्यकांत विश्वासराव व सरचिटणीस राजकुमार कदम यांनी राज्याचे मुख्यमंत्री व शालेय शिक्षण मंत्री यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे.
मराठवाडा शिक्षक संघाचे जिल्हा सचिव संजय येळवंते…… यांनी याबाबत दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, राज्याच्या शालेय शिक्षण व क्रिडा विभागाने खाजगी अनुदानित शाळेतील संचमान्यतेसाठी 15 मार्च 2024 रोजी शासनादेश निर्गमित केला आहे. या शासनादेशान्वये संचमान्यता केल्यामुळे अनेक शाळेतील शिक्षकांची पदे कमी झाली आहेत, अनेक शाळेत शून्य पदे झाल्याने अशा शाळा बंद पडणार आहेत परिणामी या शाळेतील विद्यार्थ्यांचे शिक्षण धोक्यात येणार आहे.
सार्वजनिक शिक्षण व्यवस्थेच्या नरडीला नख लावणारा, गोरगरीबांना शिक्षणाची दारे बंद करणारा हा जाचक अन्यायकारक शासनादेश असल्याने तो रद्द करावा आणि 28 ऑगस्ट 2015 च्या शासनादेशानुसार संच निर्धारण करण्यात यावा. अशी मागणी करण्यात आली आहे.
निवेदनात पुढे म्हटले आहे की, मुंबई उच्च न्यायालयात याचिका क्र 5456/2025 मधील आदेशानुसार संचमान्यतेची ‘जैसे थे’ स्थिती ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. न्यायालयीन निर्णयाची त्वरित अंमलबजावणी करण्यात यावी. सदरील शासनादेशाप्रमाणे शिक्षकांना अतिरिक्त ठरवण्यात येवू नये. सार्वजनिक शिक्षण व्यवस्थेला हानिकारक 15 मार्च 2024 च्या संचमान्यतेच्या अन्यायकारक शासन आदेशामुळे राज्यातील शिक्षण क्षेत्रात प्रचंड असंतोष निर्माण झालेला आहे. त्याची दखल घेऊन तो अन्यायकारक शासन आदेश रद्द करण्यात यावा अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा मराठवाडा शिक्षक संघाचे अध्यक्ष सुर्यकांत विश्वासराव,सरचिटणीस राजकुमार कदम,कोषाध्यक्ष औताडे ए.बी., उपाध्यक्ष ज्ञानोबा वरवट्टे,केंद्रीय कार्यकारणी सदस्य प्रेमदास राठोड, आरेफ कुरेशी, जिल्हाध्यक्ष रमेश आंधळे, मार्गदर्शक डॉ मारुती तेगमपुरे, डॉ पुरुषोत्तम जुन्ने, कोषाध्यक्ष नारायण मुंडे, उपाध्यक्ष भीमाशंकर शिंदे, जगन वाघमोडे, सहसचिव गणेश चव्हाण,प्रद्युम्न काकड,दीपक शेरे, महिला शहराध्यक्ष ज्योती पांगारकर युवा शहराध्यक्ष सोहम बोदवडे, प्रसिद्धी प्रमुख, भगवान धनगे, हकीम पटेल, सदस्य तुकाराम पडघन यांनी केले आहे.

Previous articleछत्रपती संभाजीनगर येथे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांची भेट!
Next articleरात्रीच्या वेळी रिंगरोडवर लुटमार करणारे दोन आरोपींना चंदनझिरा पोलिसांनी केली अटक
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.