आशाताई बच्छाव
सावित्रीबाई माध्यमिक विद्यालयाची यशाची परंपरा कायम
कु.पूनम शिंपाळे प्रथम तर शुभांगी चव्हाण, पूजा बगडे द्वितीय
मराठवाडा विभागीय संपादक मनोज बिरादार
शहरातील नामांकित सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय देगलूर,या विद्यालयाचा निकाल दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी उल्लेखनीय लागल्याने दहावीच्या परीक्षेत पुन्हा सावित्रीबाई फुले विद्यालयाने यशाची परंपरा कायम ठेवली.
सदरिल विद्यालयात सेमी व मराठी असे दोन वर्ग चालतात शैक्षणिक वर्ष 2024 – 25 मध्ये दोन्ही वर्गातुन एकूण 110 विद्यार्थी परिक्षेस बसलेले होते. त्यापैकी 100 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.कु. पूनम शिंपाळे (89%), कु. शुभांगी चव्हाण (88. 20%), कु. पूजा बगडे (88.20%) यांच्यासह शाळेतील सेमी तुकडीचा निकाल हा 100% असून, विशेष प्राविण्य मिळवणारे 15 विद्यार्थी तर प्रथम श्रेणीतील 36 आणि व्दितीय श्रेणीमध्ये 34 विद्यार्थी व पास विद्यार्थी 14 यशस्वी झाले असून शाळेचा निकाल हा 90.90% लागला आहे.या यशाबद्दल लोकहित शिक्षण संस्थेचे,अध्यक्ष श्री राजाराम कहाळेकर ,संस्थेचे सचिव अँड.जयवंत गजभारे , माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री यशवंत गजभारे , प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री किशन पाटील तसेच शाळेतील सर्व शिक्षक,शिक्षिका व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे तसेच दहावीच्या श्री. सोमूरे व्हि. एस व श्री चिद्रावार ए. ए तसेच परीक्षा प्रमुख विशाल पवार यांच्या सह दोन्ही वर्गाचे वर्ग शिक्षक तसेच सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले त्याबद्दल संस्थेकडून अभिनंदन करण्यात आले.






