आशाताई बच्छाव
सार्वजनिक बांधकाम उपविभाग, शिंदखेडा येथे मुंडण आंदोलन. (घेतला एका निष्पाप मुलाचा जीव
(विरदेल प्रतिनिधी-राकेश बेहेरे पाटील).
शिंदखेडा तालुक्यातील तापी नदीच्या पुलावरून अवजड वाहनांना वाहतुकीस प्रशासनाने बंदी करण्यात आली असून सर्व अवजड वाहने दभाशी ते सुकवद या रस्त्यावरून ये-जा करत आहेत. तरी अवजड वाहनांमुळे रस्त्याची दुर्दशा पूर्णपणे खराब झाली आहे. तसेच काटेरी झुडपे रस्त्याच्या दोन्ही बाजूने खूप मोठे वाढले असून एक गाडी पास होणे हि अशक्य झाले आहे. सदर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अपघात होतात. तरी या समस्येबाबत आपल्या विभागातील अभियंता यांना वेळोवेळी तोंडी स्वरुपात कळविले असून कुठल्याही प्रकारे या रस्त्याबाबत उपाययोजना केल्या गेल्या नाहीत. तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग, शिंदखेडा यांना दिनांक २३/१२/२०२४ रोजी लेखी स्वरूपात निवेदन दिले. परंतु साधा कर्मचारी ही रस्त्याबद्दल तपास करायला आला नाही. त्यानंतर दिनांक १५/०४/२०२५ रोजी स्मरणपत्र सोबत मा. नामदार जयकुमार भाऊ रावल ( पणन व राजशिष्टाचार मंत्री, महाराष्ट्र ) यांचे शिफारस पत्र देऊन त्यांना दभाशी ते सुकवद रस्त्यावरील काटेरी बाभूळ काढण्यासाठी विनंती करून त्यांना रस्त्याबाबत सर्व माहिती सांगितली की या काटेरी बाभूळ मुळे एखाद्या व्यक्तीचा जीव जाऊ शकतो. परंतु त्या विभागाने कुठल्याही प्रकारे कार्यवाही केली नाही किंवा लेखी उत्तर दिले नाही. सदर रस्त्यावर या काटेरी झुडपामुळे शुक्रवारी दिनांक ९/५/२०२५ रोजी बाळदे येथील कै. संदिप बारकु पाटील या मुलाचा अपघात झाला आणि तो जागीच ठार झाला तरी त्याच्या कुटुंबात आई, पत्नी, व दिड वर्षाचा मुलगा आहे. तरी त्या निष्पाप मुलाचा जीव गेल्यामुळे दभाशी येथील श्री. विकास दिलीप पाटील ( सरपंच प्रतिनिधी व भाजपा युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष ), सागर पाटील ( भाजपा, दभाशी शाखा अध्यक्ष ), प्रमोद पाटील, भूषण पाटील, अमोल पाटील, सुरेश पाटील, अनिल पाटील, भरत पाटील, गोपाल कोळी, योगेश भिल, स्वप्निल पाटील, प्रमोद पाटील इत्यादी. लोकांनी सार्वजनिक बांधकाम विभाग शिंदखेडा च्या दालनासमोर आपले मुंडण करून झालेल्या दूरघटनेबद्दल हळहळ व्यक्त केली आणि काटेरी बाभूळ कार्यालयात टाकून निषेध केला.






