Home उतर महाराष्ट्र एन. डी. मराठे महाविद्यालयाची उज्ज्वल यशाची परंपरा कायम

एन. डी. मराठे महाविद्यालयाची उज्ज्वल यशाची परंपरा कायम

101

आशाताई बच्छाव

1001484254.jpg

एन. डी. मराठे महाविद्यालयाची उज्ज्वल यशाची परंपरा कायम

(विरदेल प्रतिनिधी-राकेश बेहेरे पाटील). शहरातील एन. डी. मराठे महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी फेब्रुवारी २०२५ मध्ये झालेल्या उच्चमाध्यमिक शालांत परीक्षेत घवघवीत यश संपादन करत महाविद्यालयाच्या उज्वल शैक्षणिक परंपरेला साजेशी कामगिरी बजावली आहे. या परीक्षेत समर्थ किशोरसिंग गिरासे याने ८२.८३% गुणांसह शहरातील दोन्ही परीक्षा केंद्रांमधून प्रथम क्रमांक पटकावण्याचा मान मिळवला आहे. त्याच्या या उल्लेखनीय कामगिरीने महाविद्यालयाचा गौरव वाढवला आहे. शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये या परीक्षेसाठी महाविद्यालयातून एकूण १०५ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. सर्व विद्यार्थ्यांनी मेहनत, शिस्त आणि

मार्गदर्शनाचा समन्वय साधत उल्लेखनीय कामगिरी केली. महाविद्यालयात प्रथम क्रमांक समर्थ किशोरसिंग गिरासे (८२.८३%), द्वितीय अक्षदा स्वामी लांडगे (६७.००%), तृतीय भूषण विजय सैंदाणे (६४.३३%) यांनी क्रमशः यश संपादन केले. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष भाऊसाहेब साहेबराव मराठे, तसेच सिनेट सदस्य व मुख्याध्यापक श्री. अमोल मराठे यांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या प्राध्यापकांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. या घवघवीत यशामुळे महाविद्यालयाच्या शैक्षणिक उत्कृष्टतेची परंपरा अबाधित राहिली असून, संपूर्ण परिसरातून या यशाचे कौतुक होत आहे.

Previous articleडॉ. कु. दिपाली माळी यांचा सत्कार
Next articleअतनूर येथे सप्ताहाची सांगता
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.