Home उतर महाराष्ट्र सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पायाभूत सुविधांसाठी‌ प्रस्ताव सादर करा : डॉ. पंकज आशिया

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पायाभूत सुविधांसाठी‌ प्रस्ताव सादर करा : डॉ. पंकज आशिया

94

आशाताई बच्छाव

1001483922.jpg

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पायाभूत सुविधांसाठी‌ प्रस्ताव सादर करा : डॉ. पंकज आशिया
अहिल्यानगर प्रतिनिधी कारभारी गव्हाणे- नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शिर्डी व शनिशिंगणापूर येथे निर्माण करण्यात येणाऱ्या पायाभूत सुविधांसाठी संबंधित यंत्रणांनी आवश्यक निधीसह प्रस्ताव प्राधान्याने सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने जिल्हा कार्यकारी समितीच्या आढावा बैठक आयोजियत करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते.
संबंधित यंत्रणेचे अधिकारी उपस्थित
यावेळी अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, जिल्हा नियोजन अधिकारी दीपक दातीर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बापूसाहेब नागरगोजे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ. विरेंद्र बडदे हे प्रत्यक्ष तर संबंधित यंत्रणेचे अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. आशिया म्हणाले,
उत्तर प्रदेशात कुंभ निमित्ताने धार्मिक पर्यटनात वाढ झाली आहे. त्यामुळे नाशिक सोबत जिल्ह्यातील शिर्डी व शनिशिंगणापूर येथील धार्मिक पर्यटनाला चालना देण्याचे शासनाचे प्रयत्न आहेत. त्यादृष्टीने धार्मिक स्थळांना जोडणारी वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी रेल्वेस्थानक, रस्ते, विमानतळ सुविधांच्या सुधारणेवर भर द्यावा. या ठिकाणच्या कामांचे प्रस्ताव तातडीने सादर करण्यात यावेत.
पर्यटकांच्या गर्दीचे नियोजन करण्यासाठी आवश्यक सुविधांची निर्मिती करावी. आरोग्य सुविधा, सुरक्षा विषयक उपाययोजना, स्वच्छतागृह, प्रमुख रस्ते, परिसर सुशोभीकरण, पोलीस मदत केंद्रे आदी व्यवस्थेचे नियोजन करावे. शिर्डी येथे वाहनांची गर्दी न होता वाहतूक सुरळीत होण्यासाठी पर्यायी रस्त्यांची निर्मिती, बाह्यवळण रस्त्यांसाठी चाचपणी करावी.

Previous article” पुस्तक वाचा म्हणजे मस्तक ठीक होईल ” दिलिप सरोदे
Next articleडॉ. कु. दिपाली माळी यांचा सत्कार
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.