Home नांदेड भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना नवीन व नुतनीकरणाचे अर्जाबाबत सूचना

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना नवीन व नुतनीकरणाचे अर्जाबाबत सूचना

81

आशाताई बच्छाव

1001480708.jpg

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना नवीन व नुतनीकरणाचे अर्जाबाबत सूचना

सन 2024-25 मधील विद्यार्थ्यानी बँक खात्याची माहिती संकेतस्थळावर भरण्याचे आवाहन
मराठवाडा विभागीय संपादक मनोज बिरादार
नांदेड :- महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील जे विद्यार्थी शासकीय प्रवेशास पात्र असून प्रवेश मिळालेला नाही. अशा विद्यार्थ्यांना मॅट्रीकोत्तर शिक्षण घेता यावे म्हणून भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधा विद्यार्थ्यांना स्वतः उपलब्ध करून घेण्यासाठी आवश्यक रक्कम संबधीत अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट वितरीत करण्यासाठी 13 जुन 2018 व 26 डिसेंबर 2024 च्या शासन निर्णयान्वये भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना राबविण्यात येत आहे.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये ज्या विद्यार्थ्यांनी नवीन व नुतनीकरण ऑनलाईन अर्ज भरलेले आहेत, अशा विद्यार्थ्यांचे नुतनीकरण अर्ज ऑनलाईन पध्दतीने तपासणी सुरु आहे. ज्या विद्यार्थ्यांचे अर्ज अपूर्ण कागदपत्राअभावी त्रुटीत आलेले आहेत अशा विद्यार्थ्यांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर एसएमएस द्वारे माहिती देण्यात येत असून सदारच्या त्रुटीची हि शेवटची संधी देण्यात आलेली आहे. अर्ज त्रुटीत आलेल्या विद्यार्थ्यांनी https://www.syn.mahasamajkalyan.in संकेतस्थळावर भेट द्यावी. तसेच आपल्या अर्जातील त्रुटीची पूर्तता एसएमएस प्राप्त झाल्याच्या 13 मे 2025 या कालावधीत कार्यालयास सादर करावयाची आहेत, याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी केले आहे.

तसेच सन 2024-25 मधील ज्या विद्यार्थ्यानी ऑनलाईन प्रणालीमार्फत बँक खाते चे सर्व माहिती https://hmas.mahait.org या संकेतस्थळावर तात्काळ माहिती व्यवस्थीत भरावी जेणेकरून या वर्षीचा लाभ देणे सोयीचे होईल. तसेच सन 2023-24 मधील लाभार्थ्यानी https://www.syn.mahasamajkalyan.in ज्या विद्यार्थ्यांचे अर्ज त्रुटीत आलेले आहेत, अशा विद्यार्थ्यांनी ऑनलाईन प्रणालीवर ज्या कागदपत्रांची पुर्तता केलेली आहे, त्याची प्रत सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय डॉ. बाबासाहेब आंबेडकर असे आवाहन सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी केले आहे.

Previous articleराष्ट्रीय खाद्यतेल अभियान तेलबिया अंतर्गत मुल्य साखळी भागीदार निवड प्रक्रिया
Next articleमुळा कारखाना मैदानावर जगदंबा प्रिमियर लिग ची मेगा फायनल
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.