Home नांदेड 100 दिवसांचा कृती आराखडा नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयाची सर्वोत्तम कामगिरी; राज्यात पाचवा तर...

100 दिवसांचा कृती आराखडा नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयाची सर्वोत्तम कामगिरी; राज्यात पाचवा तर छत्रपती संभाजीनगर विभागात अव्वल क्रमांक

94

आशाताई बच्छाव

1001467880.jpg

100 दिवसांचा कृती आराखडा नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयाची सर्वोत्तम कामगिरी; राज्यात पाचवा तर छत्रपती संभाजीनगर विभागात अव्वल क्रमांक

परिक्षेत्र पोलीस उपमहानिरीक्षक कार्यालयाचा राज्यात दुसरा क्रमांक
मराठवाडा विभागीय संपादक मनोज बिरादार नांदेड, :- 100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा मोहिमेच्या पहिल्या टप्याचा निकाल काल जाहिर झाला. सर्वोत्कृष्ट कामगिरी बजावलेल्या महाराष्ट्रातील जिल्हाधिकारी कार्यालयात नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयाने 66.86 गुण मिळवून राज्यात पाचवा तर छत्रपती संभाजीनगर विभागात प्रथम क्रमांक पटकाविला.
तर राज्यात परिक्षेत्र पोलीस महानिरीक्षक कार्यालयामध्ये नांदेड पोलीस उपमहानिरीक्षक कार्यालयाने 61.14 गुण मिळवून सर्वोत्तम कामगिरी करत दुसरा क्रमांक पटकाविला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनानुसार प्रत्येक कार्यालयाला 100 दिवसांचा कृती आराखड्यानुसार कार्यालयीन सुधारणा करण्याबाबत निर्देश दिले होते.

या 100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणांचा भारतीय गुणवत्ता परिषद कॉलीटी कॉन्सिल ऑफ इंडिया यांच्यामार्फत या मोहिमेचे मुल्यमापन करण्यात आले आहे. यामध्ये संकेतस्थळ अद्ययावत, सुकर जीवनमान, स्वच्छता, तक्रार निवारण, कार्यालयीन सोयी-सुविधा, क्षेत्रीय कार्यालयांना भेटी, ई-ऑफिस प्रणाली, आर्थिक व औद्यागिक गुंतवणुकीस प्रोत्साहन, अधिकारी कर्मचारी प्रशिक्षण, सेवा विषयक बाबी आणि कृत्रीम बुध्दीमत्ता तंत्रज्ञानाचा वापर, नाविन्यपूर्ण उपक्रम या निकषाच्या आधारे पहिल्या टप्प्याचा निकाल काल १ मे रोजी जाहिर झाला.

Previous articleतहानलेल्या पळसखेडा पिंपळे गावासाठी दीपक जाधव व संदीप शिरसाठ यांचे उपोषण
Next articleबावनथडी प्रकल्पाचे पाणी नदी पात्रात 5 मे ला न सोडल्यास ६ मे पासून शेतकऱ्यांचा आंदोलन पेटणार
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.