Home उतर महाराष्ट्र राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे विचार आत्मसात करण्याची गरज : ॲड.कॉ. सुभाष लांडे पाटील

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे विचार आत्मसात करण्याची गरज : ॲड.कॉ. सुभाष लांडे पाटील

120

आशाताई बच्छाव

1001461527.jpg

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे विचार आत्मसात करण्याची गरज
: ॲड.कॉ. सुभाष लांडे पाटील

जनकल्याण फाउंडेशनचे पुरस्कार वितरण.

कुकाणा ता. नेवासा (प्रतिनिधी) : ग्रामीण भागातील लोक गुण्यागोविंदाने विविध कार्यक्रम,उपक्रम आणि सन उत्सव एकत्रपणे साजरे करीत होते, परंतु अलीकडच्या काळात मतांच्या राजकारणासाठी काही शक्तींकडून घडवून आणल्या जात असलेल्या विविध घटनांमुळे जनजीवन विस्कळीत होण्याचा धोका निर्माण होत आहे. हे थांबवण्यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे ग्रामीण जीवन समृद्ध करण्याचे विचार आत्मसात करणे गरजेचे आहे.* असे मत भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सेक्रेटरी ॲड कॉम्रेड सुभाष लांडे पाटील यांनी व्यक्त केले.
जनकल्याण फाउंडेशन गोंडेगाव च्या वतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुरस्कार वितरण प्रसंगी ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते ज्ञानदेव पांडुळे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून कॉम्रेड बाबा आरगडे, शब्दगंध चे संस्थापक सुनील गोसावी, ॲड बन्सी सातपुते,शाहीर भारत गाडेकर,प्रा. डॉ. अशोक कानडे, शाहीर सखाराम महापुरे, कॉ. आप्पासाहेब वाबळे, हमाल पंचायत चे जिल्हाध्यक्ष अविनाश घुले,जन कल्याणचे अध्यक्ष पांडुरंग रोडगे इ. मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना कॉ. सुभाष लांडे पाटील म्हणाले की, गावचे गावपण टिकून ठेवण्यासाठी सामाजिक सलोखा राखण्याचे काम अशा कार्यक्रमामधून होत आहे. समाजातील विविध क्षेत्रांतील कर्तव्य भावनेने समर्पित होवून काम करणाऱ्या व्यक्तींची निवड करून त्यांचा आदर सत्कार, गौरव करण्याचे. जनकल्याण फाउंडेशन चे कार्य निश्चितच प्रेरणादायी आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्ञानदेव पांडुळे अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, ग्रामीण भागात अशा कार्यक्रमाची नितांत गरज असून जनकल्याण फाउंडेशन हे काम करत असल्याचे पाहून आनंद वाटत आहे.
यावेळी प्रा.डॉ.अशोक कानडे यांनी प्रास्ताविक केले, शब्दगंध चे संस्थापक सुनील गोसावी यांनी आभार मानले तर रज्याक शेख,डॉ संतोष तागड यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
अविनाश मंत्री, ॲड.बंशी सातपुते यांनी मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या.
कवी सुभाष सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या काव्य संमेलनात चंद्रकांत कर्डक,गीताराम नरवडे, आनंदा साळवे, बाळासाहेब मंतोडे,आत्माराम शेवाळे, डॉ बेंनजीर शेख यांच्यासह अनेकांनी आपल्या गीत रचना सादर केल्या तर या काव्य संमेलनाचे सूत्रसंचालन बाळासाहेब कोठुळे यांनी केले.
यावेळी सामाजिक कार्याबद्दल अविनाश घुले, पत्रकारिता बद्दल अविनाश मंत्री, साहित्याबद्दल प्रकाश खंडागळे, आरोग्य सेविका ज्योती तोडमल, कृषिभूषण प्रवीण रोकडे, कलावंत किरण बेरड यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच विविध स्पर्धांमध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थी व अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. शाहीर भारत गाडेकर यांनी महाराष्ट्र गीत सादर करून कार्यक्रमात रंगत आणली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जनकल्याण फाउंडेशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Previous articleअमरावती जिल्ह्यातील गुरुकुंज मोझरी येथे , अभिवादनाने कलश रथ यात्रेचा शुभारंभ.
Next articleराष्ट्रीय युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या हिंगोली जिल्हा आध्यक्षपदी श्रीहरी अंभोरे पाटील यांची निवड
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.