आशाताई बच्छाव
अखिल भारत हिंदू महासभा जिल्हा कार्यालय द्वारे
जाहीर निषेध आंदोलन
कोल्हापूर ( प्रतिनिधी अविनाश शेलार यांजकडून)
आज दिनांक २७ एप्रिल २०२५ रोजी, संध्याकाळी 5 वाजता शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराज चौक, कोल्हापूर येथे जम्मू-कश्मीरच्या पहलगाममध्ये हिंदूंवर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्यासाठी सकल हिंदू समाजाच्या वतीने महिलांच्या उपस्थितीमध्ये आणि उत्स्फूर्त पने जाहीर निषेध आंदोलन आयोजित करण्यात आले.
या आंदोलनात पाकिस्तानचा राष्ट्रध्वज पायदळी तुडवण्यात आला भारत सरकार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाकिस्तान जगाच्या नकाशातून हटवावा या साठी मेलद्वारे निवेदन देण्यात आले
सर्वप्रथम पाकिस्तानचा राष्ट्रध्वज रस्त्यावर अंथरूण त्यावर महिलांच्या उपस्थितीत चपला मारण्यात आल्या हा अभिनव निषेध उपक्रम आज राबविण्यात आला. हातात भगवे ध्वज वंदे मातरम आणि भारत माता की जय या , घोषणांनी दुमदुमलेला परिसर पाकिस्तान मुर्दाबाद पाकिस्तान जला दो जलादो अशा पाकिस्तान बद्दल घोषणा देण्यात आल्या आणि राष्ट्रभक्तीने भारलेली हवा, हे दृश्य अत्यंत प्रेरणादायी होते.
प्रत्येक हिंदूच्या मनातील रोष आणि संघर्षाची भावना प्रकट करताना, 10 बाय 15 आकाराचा पाकिस्तानचा झेंडा आणि दहशतवाद्यांच्या प्रतिमा जमलेल्या हिंदू बांधवांनी पायाखाली तुडवत जाळल्या. “हिंदू शांत असतो, पण जागा झाला की अटकेपार झेंडा लावतो ”
हिंदू संस्कृतीतील वैदिक सनातनी धर्म म्हणजेच हिंदू धर्म आहे या हिंदू धर्माला गालबोट लावण्याचे काम प्रथम पाकिस्तानने केले आहे गेल्या 70 वर्षात कित्येक जवान शहीद झाले आहेत याला कारणीभूत काँग्रेस सरकार आणि त्यांचे निष्काळजी धोरण होते याचा निषेध सुद्धा करण्यात आला
या निषेध आंदोलनामध्ये
जिल्हाध्यक्ष संदीप सासने विनोद पालकर मनोहर सोरप मालोजी केरकर अविनाश शेलार हेमंत ठाणेकर शरद ठाणेकर विजय बागडी ज्योती बागडी .शोभाताई शेलार (पाटील) महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सौ.स्वातीताई राजपूत (कोल्हापूर जिल्हा महिला अध्यक्ष) मीनाक्षी डोंगरसाने प्रियंका राजपूत निर्मला धोत्रे कांचन धोत्रे निकिता कल कुटकी लक्ष्मी कलकुटकी सविता देशिंगकर नयना देशिंगकर रवीना ताई वडर पूजा कलकुटकी आदी उपस्थित होते






