आशाताई बच्छाव
पेहेलगाम येथील अतिरेक्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याच्या दोंडाईचा शहर तर्फे कैंडल मार्च काढून निषेध
(विरदेल प्रतिनिधी -राकेश बेहेरे पाटील)
दोंडाईचा, ता- शिंदखेडा येथील दिनांक २५/४/२०२५ रोजी सायंकाळी जम्मू कश्मीर मधील पेहेलगाम येथे पाकिस्तानी अतिरेक्यांनी हिंदू भारतीय पर्यटकांवर भ्याड हल्ला करून निष्पाप २८ भारतीय नागरिकांना मृत्युमुखी पाडले. त्या घटनेचा छत्रपती शिवाजी महाराज पुतळा पोस्ट ऑफिस पासून कैंडल मोर्चा काढून जाहीरपणे निषेध व्यक्त केला भारतीय जनता पार्टी, शिवसेना ( उ. बा. ठा गट), कॉग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तसेच व्यापारी वर्ग व हिंदू मुस्लिम बांधवांनी एकत्र येऊन कैंडल मार्च काढून निषेध व्यक्त करण्यातं आला.
केंद्र सरकारने कठोर पावले उचलून दहशतवाद्यांना कंठस्नान घालावे कारण की २८ भारतीय नागरिकांना धर्म विचारून अमानुषपणे गोळ्या झाडून मारण्यांत आले आहे. हा दहशतवादी हल्ला घडवून आणणाऱ्या संघटनेच्या दहशतवाद्यांना कठोरातील कठोर शासन झाले पाहिजे
यावेळी विविध संघटनातर्फे भ्याड हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या सर्व हिंदू पर्यटक बांधवांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
याप्रसंगी दोंडाईचा नगरपरिषद चे माजी उपनगराध्यक्ष रविंद्र भैय्या उपाध्ये, माजी नगरसेवक रविंद्र भाऊ जाधव, शिवसेना तालुकाध्यक्ष शैलेश भाऊ सोनार, के. एम. अग्रवाल,अनिल अग्रवाल, अशोक कुचेरीया, कैलास शर्मा,डॉ अनिल बेहरे, डॉ राजेंद्र गुप्ता, इंधन शेठ, शिभान शेख.,मुन्ना खाटिक,
अमर इंदाणी, नवनीत जैन, दिपक कुकरेजा, केदारनाथ कवडीवाले, संजय मोरे, गजु दादा, असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.






