आशाताई बच्छाव
आत्ताची मोठी बातमी…
नाशिकच्या मालेगावात आज ईडीचे नऊ ठिकाणी छापेमारी
(राजेंद्र पाटील राऊत)
मालेगाव: संपूर्ण राज्यात गाजत असलेल्या बनावट जन्म मृत्यू दाखल्या प्रकरणी भाजपाच्या किरीट सोमय्या यांनी घेतलेल्या भुमिकेनंतर येथे बनावट जन्म मृत्यू दाखल्या प्रकरणी मोठीच खळबळ उडाली होती.त्यात ईडीचे अधिकारी मालेगावात तळ ठोकून होते.त्यात बहुतांश अधिका-यांना आपल्या नोकरीवरून पायउतार व्हावे लागले होते तर अनेकजण अजूनही तुरुंगात आहेत.
असे असताना कोल्हापूर येथील हिंदूत्ववादी संघटनांनी केलेल्या मागणीनंतर आज दिनांक २५ रोजी ईडीच्या अधिका-यांनी मालेगावात अचानक नऊ ठिकाणावर छापेमारी करीत बनावट जन्म मृत्यू दाखल्या प्रकरणी किती बांगलादेशी रोहिंगे या प्रकरणी गुंतलेले आहेत याची कसून चौकशी सुरू केल्याने पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.दरम्यान ईडी पथकातील अधिका-यांनी केलेल्या कारवाईची सविस्तर माहिती हे वृत्त लिहीपर्यत प्राप्त झाली नव्हती.






