आशाताई बच्छाव
कामात निकृष्टपणा आणि खोळंबळलेली कामे करा अन्यथा शिंगाडे मोर्चा काढण्याचा शानाभाऊ सोनवणेंचा इशारा
(विरदेल प्रतिनिधी राकेश बेहेरे पाटील). शिवसेना (उबाठा) गटाचे उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे बांच्या नेतृत्वाखाली आज
सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी दोंडाईचा मनिष वाघ यांना शानाभाऊ सोनवणे व पदाधिकारी यांनी
निवेदन दिले त्या निवेदनातुन दोंडाईचा, दाऊळ, झोटवाडे, शेंदवाडे, साहूर रस्ता मंजुर झालेला असताना प्रशासन व
ठेकेदाराच्या आडमुठ्या धोरणामुळे रस्त्याचे काम रखडले असल्याने त्या रस्त्यावरुन प्रवासी प्रवास करत असताना अपघात होऊन अनेकांचे
प्राण गेलेत तर अनेकांना दुखापत झाली असून प्रशासकीय अधिकान्यांना अनेक वेळा सुचित केले असुन जे ठेकेदार निकृष्ट दर्जाचे कामे करतात त्या मुळे रस्ते लवकर खराब होतात व काही ठेकेदार काम करत नसतील त्यांना काळ्या यादीत टाकुन त्यांच्या नावाचे काम रद्द करुन ते काम दुसऱ्या ठेकेदाराला देण्यात यावे असे अनेक वेळा सुचित करुन देखील कुठल्याही प्रकारची शासनाकडून किंवा प्रशासकिय अधिकाऱ्यांन कडून हालचाल दिसुन येत नाही आहे. या रस्त्याच्या कामाकडे मुद्दाम दुर्लक्ष केले जात असल्याचे दिसून येत आहे. साहुर गावाला अनेक वर्षांपासून शासन तापी नदीच्या वाळुचा ठेका देत असल्याने शासनाला त्यातुन मोठा महसुल मिळत आहे म्हणुन शासनाने साहुर ते दोंडाईचा रस्त्यावरील अतिक्रमण काढून रुंदीकरण वाढवून कायम स्वरुपी मजबुत रस्ता तयार करुन ध्यावा तसेच झोटवाडे येथे अमरावती नदी लगत व साहुर येथे मदारी नाला लगत संरक्षण भिंत मंजुर असुन येत्या पावसाळा आगोदर संरक्षण भिंत बांधकाम करण्यात यावी. त्याचप्रमाणे प्रमुख जिल्हा मार्ग क्र १८ हा बळसाणे येथील जैन मंदिर पासुन तर साहुर येथील तापी नदीच्या काठावरील श्री रामायणकार महर्षी वाल्मिकी ऋषी यांच्या मंदिरा पर्यंत ऍम मंजुर करावा व दोंडाईचा शहरातील जुने शहादा रस्त्यावरील रेल्वे गेट बंद करून दाऊळ व सिंधी कॉलनी कडे जाण्यासाठी बोगदा तयार करण्यात यावा. वरील सर्व मागण्या ची पुर्तता या १५ दिवसांच्या आत केली नाही तर दाऊळ, झोटवाडे, शेंदवाडे, साहुर, मंदाणे, तावखेडा प्र. न. येथील गावकरी दि. ५ मे २०२५ रोजी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा पासुन बसस्टेशन मार्ग शासनाच्या निषेध व्यक्त करत आपल्या सार्वजनिक बांधकाम विभाग दोंडाईचा कार्यालयावर मोठा शिंगाडा मोर्चा काढण्यात येईल. त्यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी मनिष वाघ यांनी सांगितले की आपल्या मागण्या ची लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करतो असे आश्वासन दिले त्यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे नरेंद्र भामरे मा. उपसरपंच दाऊळ, शिवसेना दोंडाईचा शहर प्रमुख शैलेश सोनार, भुषण सोनवणे, अविनाश सोनवणे, रोशन कोळी, लोटन देसले, निलेश कोळी, नरेंद्र वंजारी सह शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते.






