Home नांदेड राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेश सचिवपदी विक्रम नागशेट्टीवार निवड.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेश सचिवपदी विक्रम नागशेट्टीवार निवड.

138

आशाताई बच्छाव

1001405469.jpg

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेश सचिवपदी विक्रम नागशेट्टीवार निवड.

मराठवाडा विभागीय संपादक मनोज बिरादार

युवकांच्या नेतृत्व क्षमतेला प्रोत्साहन देत राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेश सचिवपदी विक्रम नागशेट्टीवार यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या नियुक्तीचे पत्र आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या हस्ते देण्यात आले. या निवडीमुळे स्थानिक राजकारणात नवचैतन्याचे वारे वाहू लागले आहेत.

या प्रसंगी जेष्ठ नेते आणि माजी मंत्री भास्कराव खतगावकर, रामदास पाटील सुमठानकर, माधव पावडे, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब रावणगावकर, दिगंबर कौरवार, कन्हैया कदम, संभाजी मुकनर, स्वप्नील इंगळे, बालाजी शिंदे, मोसीन खान पठाण, चंद्रकांत टेकाळे, अशोक कांबळे, संतोष थडके, योगेश राऊलवार, योगेश मैलागिरे, बालाजी अनमूलवार, शुभम मारकवाड यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

विक्रम नागशेट्टीवार यांचं संघटन कौशल्य, सातत्याने केलेलं सामाजिक कार्य आणि युवकांशी असलेला दृढ संपर्क या गुणांच्या जोरावर त्यांची ही निवड करण्यात आली. यामुळे जिल्ह्यातील युवकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या नियुक्तीबद्दल नागशेट्टीवार यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत असून, भविष्यात पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी ते प्रभावी भूमिका बजावतील, असा विश्वास पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून व्यक्त करण्यात आला आहे. या निवडीबद्दल विक्रम नागशेट्टीवार यांनी सर्व नेतेमंडळींचे आभार मानले.

Previous articleनांदेड जिल्ह्यासाठी हवामान खात्याचा इशारा
Next articleनांदेड जिल्ह्यासाठी हवामान खात्याचा इशारा
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.