आशाताई बच्छाव
कुटुंब व सामाजिक मूल्यांचे भान गरजेचे – निलेश जामठे. दैनिक युवा मराठा. पी एन देशमुख. अमरावती जिल्हा प्रतिनिधी. अमरावती.
डॉ.श्रेयस सोनोने हा एमबीबीएस झाल्याबद्दल करण्यात आला गौरव
राष्ट्रिय चर्मकार महासंघाचे आयोजन
माहिती तंत्रज्ञानाच्या जगात वावरताना कुटुंब व सामाजिक मूल्यांचे भान असणे गरजेचे असून विद्यार्थ्यांनी स्वतःच्या ध्येय सिद्धीसोबतच आदर्श व्यक्तीमत्व निर्माण करून राष्ट्राच्या सर्वांगीण विकासात योगदान द्यावे असे प्रतिपादन राष्ट्रिय चर्मकार महासंघाचे जिल्हाध्यक्ष निलेश जामठे यांनी केले.
औरगपुरा,अमरावती येथील राजेंद्र सोनोने यांचा मुलगा चि.श्रेयस सोनोने ह्याने अत्यंत गरीब परिस्थितीतुन शिक्षण घेत टोपीवाला राष्ट्रीय वैद्यकीय महाविद्यालय व बा.य.ल.नायर रुग्णालय मुंबई येथून एमबीबीएस उत्तीर्ण झाल्याबद्दल शाल,सन्मानचिन्ह,पुष्पगुच्छ व संत रविदास महाराज पुस्तीका देऊन राष्ट्रिय चर्मकार महासंघातर्फे सत्कार करण्यात आला.भविष्यामध्ये एम.डी.करण्याचा मानस श्रेयसने सत्कारप्रसंगी व्यक्त केला.श्रेयस हा सर्वसाधारण कुटुंबातील असुन आई वडीलांनी मोलमजूरी करुन हलाखीच्या परिस्थितीमध्ये श्रेयसचे डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण केले. सत्कार करतेवेळी रा.का.सदस्य शामभाऊ आकोडे,जिल्हाध्यक्ष निलेश जामठे,गठाई कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष दिलीप वरजे,जिल्हा कार्यकारणी सदस्य राजुभाऊ चव्हाण,सामाजिक कार्यकर्ते प्रमोद इंगळे,अंकुश पाटील,राजेंद्र सोनोने,सतिश मदन वरजे आदिसह परिसरातील समाजबांधव उपस्थित होते.






