Home उतर महाराष्ट्र नवोदय प्रवेश परीक्षेत एन. डी. मराठे विद्यालयातील विद्यार्थ्यांचे घवघवीत यश.

नवोदय प्रवेश परीक्षेत एन. डी. मराठे विद्यालयातील विद्यार्थ्यांचे घवघवीत यश.

116

आशाताई बच्छाव

1001397416.jpg

नवोदय प्रवेश परीक्षेत एन. डी. मराठे विद्यालयातील विद्यार्थ्यांचे घवघवीत यश.
(विरदेल प्रतिनिधी-राकेश बेहेरे पाटील)
शिंदखेडा– शहरातील एन.डी. मराठे शैक्षणिक संकुलातील विद्यार्थ्यांनी शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये घेण्यात आलेल्या नवोदय विद्यालय समितीच्या इयत्ता सहावीच्या प्रवेश परीक्षेत अत्यंत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. प्रथम यादीत दोन विद्यार्थ्यांची निवड नवोदय विद्यालयात झाली असून, ही शाळेसाठी अभिमानाची बाब आहे. या परीक्षेत तालुक्यातील शेकडो विद्यार्थी सहभागी झाले होते. प्रचंड स्पर्धेमध्येही एन. डी. मराठे विद्यालयातील विद्यार्थ्यांनी आपली गुणवत्ता सिद्ध करत यश मिळवले. यामध्ये कु. साक्षी चंद्रकांत पिंपळीस्कर व कु.जीवेश सचिन देशमुख या विद्यार्थ्यांची नवोदय विद्यालयासाठी निवड झाली आहे.
संस्थेचे अध्यक्ष भाऊसाहेब श्री साहेबरावजी मराठे, व विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री अमोल मराठे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे विशेष अभिनंदन केले असून, यामागे शिक्षकांचे मार्गदर्शन, विद्यार्थ्यांची चिकाटी आणि पालकांचे सहकार्य यांचा मोलाचा वाटा असल्याचे नमूद केले. नवोदय परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन, सराव चाचण्या आणि विशेष सत्रांचे आयोजन करण्यात आले होते.
या यशामुळे इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळेल. हे विद्यार्थी आता नवोदयसारख्या प्रतिष्ठित संस्थेमध्ये शिक्षण घेऊन पुढील शैक्षणिक वाटचाल यशस्वी करतील.
यशस्वी विद्यार्थ्यांच्या पालकांनी आनंद व्यक्त करत शाळेचे व शिक्षकांचे आभार मानले. शाळेच्या वतीने यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.

Previous articleएन. डी. मराठे शैक्षणिक संकुलात वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न
Next articleराज्यात पहिली आलेली “रूंजी” हिचा शहरात प्रथमच सत्कार
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.