Home गडचिरोली भाजपच्या वतीने स्थापना दिवस व श्रीराम नवमी उत्साहात साजरी.._

भाजपच्या वतीने स्थापना दिवस व श्रीराम नवमी उत्साहात साजरी.._

80

आशाताई बच्छाव

1001392854.jpg

भाजपच्या वतीने स्थापना दिवस व श्रीराम नवमी उत्साहात साजरी.._

 

गडचिरोली सुरज गुंडमवार ब्युरो चीफ:- भारतीय जनता पक्ष, गडचिरोली जिल्ह्याच्या वतीने पक्षाचा ४५ वा स्थापना दिवस व प्रभू श्रीराम नवमीचा पावन सण संपूर्ण जिल्ह्यातील १५ मंडळांमध्ये मोठ्या उत्साहात, भक्तिभावाने आणि संघटित पद्धतीने साजरा करण्यात आला.

या निमित्ताने भाजप जिल्हाध्यक्ष मा. प्रशांतजी वाघरे यांनी जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व पक्षाला मतदान करून विजय मिळवून देणाऱ्या जनतेचे मनःपूर्वक आभार मानले. तसेच सर्वांना शुभेच्छा देताना त्यांनी म्हणाले, “आपल्या कार्यकर्त्यांनी लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये खंबीरपणे पक्षासाठी काम केले. ‘घर-घर चलो’ अभियानाच्या माध्यमातून सरकारच्या योजनांचा लाभ जनतेपर्यंत पोहोचवण्यात आला. या कार्यामुळे विधानसभा निवडणुकीत आपल्याला यश मिळाले. हे यश हे कार्यकर्त्यांचेच आहे आणि भविष्यातील निवडणुकांमध्येही हेच कार्य प्रेरणा देणारे ठरेल.”

स्थापना दिनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक मंडळात प्रमुख वक्त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी ‘मेरा परिवार, भाजपा का परिवार’ उपक्रमांतर्गत आपल्या घरावर भाजपचा ध्वज फडकावला व जनतेत राष्ट्रनिष्ठा, संघटन व भक्तिभावाची भावना जागवली.

या कार्यक्रमांमुळे पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, आगामी निवडणुकांमध्ये भाजप अधिक बळकटपणे उभा राहील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.