Home मराठवाडा विजांसह तासभर वादळ; अतनूर पट्ट्यात २८ गावात अवकाळी ! बारा बलुतेदारांपैकी कुंभारांचेही...

विजांसह तासभर वादळ; अतनूर पट्ट्यात २८ गावात अवकाळी ! बारा बलुतेदारांपैकी कुंभारांचेही मोठे नुकसान!

110

आशाताई बच्छाव

1001384441.jpg

विजांसह तासभर वादळ; अतनूर पट्ट्यात २८ गावात अवकाळी ! बारा बलुतेदारांपैकी कुंभारांचेही मोठे नुकसान!
बी.जी.शिंदे, अतनूर उदगीर / प्रतिनिधी
जळकोट तालुक्यातील अतनूर सह परिसरात गुरुवारी सायंकाळी सात वाजेपासून आठ वाजेपर्यंत विजांच्या कडकडाटात जोरदार वादळाचा तडाखा देऊन बालाघाटाच्या पर्वत रांगेत वसलेल्या डोंगरी व अतिदुर्गम भागातील अतनूर पट्ट्यात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली होती. त्यामुळे उन्हाळी व रब्बीच्या पिके वादळी वाऱ्याने आडवी झाली असून अवकाळी पावसामुळे कापणी केलेली रब्बीची पिके भिजली आहे. त्यामुळे नुकसान झाले आहे. तसेच गोरगरिबाचे फ्रिज म्हणून घरोघरी, दारोदारी वापरण्यात येणारे नैसर्गिक मातीतून तयार झालेले मटका, गाडगे तसेच उन्हाळ्यात होणाऱ्या गर्मीपासून शरीरात थंडावा मिळावा म्हणून घरोघरी गोरगरीब फ्रिज म्हणून वापरण्यात येणारे मातीचे मडके, मटका, माती मिश्रीत मडके याचे पण मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. तसेच बारा बलुतेदांरांपैकी एक असलेल्या कुंभार समाजाचेही या परिसरात व गावात मोठ्या प्रमाणात वास्तव्य आहे. ते येथीलच मूळ रहिवासी असल्यामुळे त्यांचा रोजीरोटी चा व्यवसाय नैसर्गिक माती कामातून मडकी, मटकी व माती पासून निर्मित होणारे विविध चुली, मातीच्या चुली, भांडे, मटका, मडके तसेच वीटभट्टीचाही व्यवसाय व दैनंदिन आर्थिक गरजा भागविण्याकरिता या कुंभार समाजाने उत्पादित करीत असलेल्या माती निमित्त साहित्यांचा ही समावेश आहे. यांचीही मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. तालुका कृषी विभागाकडून नुकसानीची माहिती घेण्याचे काम सुरू करावे अशी मागणी होत आहे.
जळकोट तालुक्यातील अतनूर, गव्हाण, मेवापूर, चिंचोली, गुत्ती, मुत्तलगाव, धोंडवाडी, घोणसी, तिरुका, हळद वाढवणा, मांजरी, अवलकोंडा, कोदळी, रामपूर, शिवाजीनगर, हळद वडवणा, मरसांगवी, अतनुर तांडा, भवानीनगर, शिवाजीनगर सह परिसरातील २८ गाव,वाडी, तांडा, वस्तीत गुरुवारी तासभर वादळी वारे सुरु होते. त्यातच अतनूर भागातील २८ वाडी, तांडा, वस्ती, गाव या भागात जोरदार तर तांडा या भागात हलक्या स्वरूपात अवकाळीच्या पावसाने हजेरी लावली आहे. दरम्यान वादळी वाऱ्यात. उन्हाळी मका, भाजीपाला, फळबागांची तसेच केसरी आंबा, रब्बीतील गहू, ज्वारी, बाजरी, केळी पिके आडवी झाली असून नुकसानीची माहिती घेण्यासाठी महसूल व कृषी विभाग सज्ज व्हावे, अशी मागणी अवकाळीचा तडाखा बसलेल्या शेतकरी, अतनूरचे सरपंच चंद्रशेखर पाटील, गव्हाणचे सरपंच बालाजी गुडसुरे, चिंचोलीच्या सरपंच सौ.रेखा बिरादार, गुत्तीच्या सरपंच सौ.मीना यादव केंद्रे, युवा नेते यादवराव केंद्रे, शिवसेनेचे जिल्हा सरचिटणीस विकास सोमुसे-पाटील, शिवसेनेचे माजी तालुकाध्यक्ष मुक्तेश्वर पाटील, कुणबी मराठा शेतकरी सेनेचे शाखाध्यक्ष कैलास सोमुसे-पाटील, कुणबी शेतकरी गटाचे अध्यक्ष बी.जी.शिंदे, धोंडीराम सोमुसे, विजयकुमार पाटील, साहेबराव पाटील, दिलीपराव पाटील, किशन मुगदळे, माजी सरपंच संतोष बट्टेवाड, मेवापूरच्या सरपंच सौ.कोमल तुळशीदास पाटील, सामाजिक कार्यकर्ते तुळशीदास पाटील, अमोल गायकवाड यासह बळिराजा वर्गाने केली आहे.
दरम्यान अवकाळीच्या पावसाने व वादळी वाऱ्याने नुकसान झालेल्या भागाची माहिती देण्याचा सूचना तालुका कृषी अधिकारी आकाश पवार, कृषी पर्यवेक्षक व कृषी सहाय्यक संदीप पाटील यांना दिल्या आहेत. महसूल कडून ग्राम महसूल अधिकारी व अतनूर सज्जाचे तलाठी अतीक शेख यांना सज्ज राहण्याची सूचना तहसीलदार राजेश लांडगे यांनी दिल्या आहेत.

Previous articleप्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयात ब्रह्या भोजनाचा महाप्रसाद वाटप
Next articleविद्यार्थ्यांनी बौद्धिक, शारीरिक क्षमता वाढवून कौशल्य प्राप्त करावे – राज्यपाल हरिभाऊ बागडे
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.