Home उतर महाराष्ट्र डी पॉल इंग्लिश मीडियम हायस्कूल मध्ये नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात अत्यंत जल्लोषात...

डी पॉल इंग्लिश मीडियम हायस्कूल मध्ये नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात अत्यंत जल्लोषात व उत्साहात करण्यात आली.

157

आशाताई बच्छाव

1001381257.jpg

श्रीरामपूर दिपक कदम तालुका प्रतिनिधी –डी पॉल इंग्लिश मीडियम हायस्कूल मध्ये नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात अत्यंत जल्लोषात व उत्साहात करण्यात आली. संपूर्ण विद्यालय विविध फुलांनी आणि फुग्यांनी बहरून गेले .याप्रसंगी इयत्ता दुसरीच्या विद्यार्थिनी कुमारी स्नेहल व कुमारी प्रतीक्षा यांनी स्वागत नृत्य सादर केले. कार्यक्रमाप्रसंगी विदयालयाचे व्यवस्थापक रेव्ह फादर फ्रॅंको आणि विद्यालयाच्या प्राचार्या रेव्ह सिस्टर्स सेलिन यांनी सर्व विद्यार्थ्यांना, शिक्षकांना ,शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना नवीन शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा दिल्या .एलिझाबेथ वाकडे, मालन मोहन, स्वाती गायकवाड, प्रतीक्षा कोळगे ,अपर्णा नायर, सुनिता सोनवणे, बिना कदम यांनी मुलांना औक्षण करून विविध भेटवस्तू देऊन आणि पुष्पवर्षाव करून विद्यार्थ्यांचे स्वागत केले. विद्यार्थ्यांचे दहावीच्या विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले या कार्यक्रमासाठी रेवन सिस्टर ब्लेसा, गणेश पवार सर , विकास वाघमारे सर, संदिप निबे सर ,रविंद्र लोंढे सर ,माॅली कुथूर, स्वाती घोरपडे, अनित बोधक , सुनयना भालेराव, सुनील बोरगे यांनी अथक परिश्रम घेतले. संपूर्ण विद्यालयात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण होते