आशाताई बच्छाव
भाजपा संघटन पर्व – गडचिरोली जिल्हा बैठक संपन्न गडचिरोली सुरज गुंडमवार ब्युरो चीफ
गडचिरोली जिल्हा भाजपा संघटन पर्व अंतर्गत जिल्हा व मंडल पदाधिकारी बैठक शासकीय विश्रामगृह (सर्किट हाऊस) येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाली.
या बैठकीत भाजपाच्या संघटन प्रवासाला गती देण्यासाठी विविध विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली. तसेच, 6 एप्रिल रोजी होणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिवसाच्या नियोजनावर भर देण्यात आला. प्रत्येक कार्यकर्त्याने आपल्या घरी भाजपा ध्वज फडकवून हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करावा, असे आवाहन करण्यात आले.
विदर्भ कार्यालय प्रमुख व महाराष्ट्र सहकार्यालय प्रमुख माननीय संजयजी फांजे,भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे, माजी आमदार व भाजपा अनुसूचित जमाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते, माजी आमदार व प्रदेश उपाध्यक्ष डॉ. देवरावजी होळी, माजी आमदार कृष्णाजी गजबे, नामदेवजी उसेंडी,भाजपा किसान मोर्चा प्रदेश सचिव रमेशजी भुरसे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य रविंद्र ओल्लालवार, समन्वयक प्रमोदजी पिपरे, जिल्हा महामंत्री प्रकाशजी गेडाम, गोविंदजी सारडा, सदानंदजी कुथे, योगिता पिपरे, माजी जिल्हाध्यक्ष किसनजी नागदेवे, महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा गीताताई हिंगे, डॉ. चंदाताई कोडवते
भाजयुमो जिल्हाध्यक्ष अनिल तिडके, जेष्ठ नेते गजाननजी येनगंदलवार, जिल्हा उपाध्यक्ष डॉ. भारत खटी, अरुणजी हरडे, मोतीभाई कुकरेजा, विनोद आकनपल्लीवार तसेच जिल्हा व प्रदेश पदाधिकारी, मोर्चा अध्यक्ष, महामंत्री, मंडल अध्यक्ष, मंडल महामंत्री व मंडल निवडणूक अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भाजपा संघटन अधिक मजबूत करण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला.






