Home कोल्हापूर कर्करोग उपचारांसाठी चुंबकीय नॅनो कणांच्या निर्मितीसाठी पेटंट -डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या...

कर्करोग उपचारांसाठी चुंबकीय नॅनो कणांच्या निर्मितीसाठी पेटंट -डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या संशोधकांचे यश

113

आशाताई बच्छाव

1001374419.jpg

कर्करोग उपचारांसाठी चुंबकीय नॅनो कणांच्या निर्मितीसाठी पेटंट
-डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या संशोधकांचे यश

कोल्हापूर – अविनाश शेलार ब्युरो चीफ 
कर्करोगावरील ‘हायपरथर्मिया’ उपचारासाठी आवश्यक असलेल्या अ‍ॅमिनेटेड चुंबकीय नॅनो कणांची निर्मिती करणाऱ्या संशोधनासाठी डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या संशोधकांना पेटंट मिळाले आहे. विद्यापीठाच्या सेंटर फॉर इंटरडिसीप्लीनरी स्टडीजमधील प्राध्यापक डॉ. विश्वजीत खोत, संशोधक विद्यार्थी डॉ. सतिश फाळके आणि राजाराम कॉलेजच्या डॉ. अश्विनी साळुंखे यांनी हे संशोधन केले आहे. विद्यापीठाला मिळालेले हे ४९ वे पेटंट असून या संशोधनामुळे भविष्यात कर्करोगावर अधिक सुरक्षित आणि प्रभावी उपचार शक्य होणार आहेत.

सध्या कर्करोगावर किरणोपचार, रासायनिक उपचार आणि शस्त्रक्रिया यांसारख्या उपचार पद्धती उपलब्ध आहेत. मात्र या उपचार पद्धतीमध्ये आरोग्यदायी पेशींवर होणारे दुष्परिणाम, उपचारांसाठी होणारा मोठा खर्च आणि मर्यादित प्रभाव यांसारख्या अडचणी आढळतात. मात्र, चुंबकीय नॅनो कणांच्या मदतीने अधिक सुरक्षित आणि प्रभावी उपचार शक्य होऊ शकते.

डॉ. विश्वजीत खोत यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधक विद्यार्थी डॉ. सतिश फाळके आणि डॉ. अश्विनी साळुंखे (भौतिकशास्त्र विभाग, राजाराम कॉलेज) यांनी रासायनिक पद्धतीचा वापर करून अ‍ॅमिनेटेड चुंबकीय नॅनो कणांचे संश्लेषण केले. या कणांचे वैशिष्ट्य म्हणजे ते थेट कर्करोग पेशींशी जोडले जातात आणि बाह्य चुंबकीय क्षेत्राच्या प्रभावाने उष्णता निर्माण करतात. या प्रक्रियेमुळे ४० ते ४८ अंश सेल्सियस तापमान निर्माण होते, ज्यामुळे कर्करोग पेशी नष्ट होतात. हे संशोधन कर्करोग उपचारातील नवी क्रांती ठरण्याची शक्यता असून, भविष्यात अधिक सुरक्षित आणि प्रभावी उपचार पद्धती विकसित करणे शक्य होणार आहे.

या संशोधनासाठी सेंटर फॉर इंटरडिसिप्लिनरी रिसर्चचे अधिष्ठाता प्रा. डॉ. सी. डी. लोखंडे यांचे मार्गदर्शन लाभले. या संशोधनाबद्दल कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा आणि कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले यांनी संशोधकांचे अभिनंदन केले आहे.

Previous articleजवाहर नवोदय प्रवेश परिक्षेत ‘ श्रीराज घोरपडेन्चे यश !
Next articleसाक्री नंदुरबार रस्त्याच्या सुरू असलेल्या कामामुळे तरूणांचा अपघाती मृत्यू
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.