आशाताई बच्छाव
जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी
अहिल्यानगर, कारभारी गव्हाणे प्रतिनिधी –जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी ९ एप्रिल २०२५ पर्यंत शस्त्र व जमावबंदी आदेश जारी केला आहे. आदेशाचा भंग करणाऱ्या विरोधात कारवाई करण्यात येईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
हा आदेश धार्मिक कार्यक्रम, लग्नकार्य, लग्न मिरवणुका, किंवा प्रेतयात्रेच्या जमावास लागू राहणार नाहीत. तसेच हा आदेश पोलीस अधिकारी, कामावर असलेल्या इतर शासकीय अधिकारी, कर्मचारी यांना, सभा अगर मिरवणुका काढण्यासाठी रितसर परवानगी घेतलेल्या व्यक्तींना लागू नाही.






