Home उतर महाराष्ट्र मालीश करून न दिल्याने दुकानदारावर वार;आरोपी ताब्यात

मालीश करून न दिल्याने दुकानदारावर वार;आरोपी ताब्यात

76
0

आशाताई बच्छाव

1001361389.jpg

मालीश करून न दिल्याने दुकानदारावर वार;आरोपी ताब्यात.                                                          अहिल्यानगर कारभारी गव्हाणे प्रतिनिधी 

मालीश न करून दिल्याच्या रागातून एका सलून दुकानदारावर वस्तऱ्याने वार केल्याची घटना वडारवाडी परिसरात सलून दुकानात घडली आहे. याबाबत भिंगार कॅम्प पोलिसांनी एक आरोपी ताब्यात घेतला आहे.
याबाबत जमील खालिक शेख यांच्या फिर्यादीवरून भारत पाटील, बबन धाडगे यांच्या विरोधात भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर यांना मिळालेल्या माहितीनुसार वस्तऱ्याने वार करून जखमी करणारा आरोपी भिंगार परिसरात असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून आरोपीस ताब्यात घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here