आशाताई बच्छाव
देगलूरात अतिक्रमण हटाव मोहीम ■ जिल्हा परिषद शाळा परिसर केला मोकळा
■ पोलिस बंदोबस्तात हटविले अतिक्रमण
देगलूर तालुका प्रतिनिधी / गजानन शिंदे
देगलूर जिल्हा परिषद हायस्कूल (मुलांचे) समोर गेल्या कांही वर्षांपासून शहरातील अनेकांनी अतिक्रमण करून विविध व्यवसाय सुरू केले होते. ६ मार्च रोजी नगरपरिषद व पोलीस प्रशासनाच्या संयुक्त कारवाईतून अतिक्रमण हटविण्यास सुरुवात झाली आहे. शाळेतील मुला मुलींसाठी
आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधा देखील उपलब्ध नव्हत्याः यामुळे शहरातील सामाजिक कार्यकर्ते धनाजी जोशी यांनी जिल्ह्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडे पत्रव्यवहार करून शाळा परिसरात विद्यार्थ्यांसाठी सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. यासंदर्भात माहिती घेण्यासाठी आलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना परिसरात अतिक्रमण झाल्याचे आढळून आले. त्यांनी गटशिक्षणाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. त्यामुळे ५ मार्च रोजी
अतिक्रमण करून बांधली पक्की घरे
जिल्हा परिषद हायस्कूल (मुलांचे) शाळेच्या मुख्याध्यापक व वरिष्ठ
अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झाल्यामुळे या शाळेच्या सर्व बाजूंनी खूप मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. तसेच या शाळेच्या बाजूलाच जिल्हा परिषदेची पेठामरापूर शाखा देखील सुरू झाली आहे. या शाळेच्या बाजूला तर अतिक्रमण करून पक्के घर बांधले आहे. मुख्याध्यापक, गट साधन केंद्रातील गटशिक्षणाधिकारी व अन्य कर्मचारी यांच्या दुर्लक्षामुळे दिवसेंदिवस अतिक्रमण वाढत चालले होते.
गटशिक्षणाधिकारी यांनी मुख्याधिकारी, उपविभागीय अधिकारी, गटविकास अधिकारी यांच्याकडे पत्र पाठवून शाळा परिसरातील अतिक्रमण हटविण्याची विनंती केली. त्यानुसार ६ मार्च रोजी सकाळी ९ वाजता नगर परिषदेचे मुख्याधिकारी तानाजी चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता निरीक्षक गौरव कुमार जाधव, सिद्धार्थ वाघमारे, तुकाराम पाडले, मिर्झा असद बेग, लक्ष्मण कांबळे आणि अनेक कर्मचारी सर्व साहित्य व बुलडोझरसह घटनास्थळी
उपस्थित झाले. त्याचबरोबर देगलूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मारोती मुंडे, सपोनि अश्रुदेव पवार, पोलीस उपनिरीक्षक नरहरी फड, सहाय्यक फौजदार किरण कुलकर्णी यांच्यासह २५ अंमलदार आणि ५० होमगार्ड घटनास्थळी उपस्थित झाले. नगरपरिषद व पोलीस प्रशासनाच्या संयुक्त कारवाईतून जिल्हा परिषद शाळेसमोरील अतिक्रमण हटविण्यास सुरुवात झाली आहे. याप्रसंगी काही अतिक्रमणधारकाने स्वतः पुढाकार घेऊन आपापली अतिक्रमणे काढून घेतली.






