
आशाताई बच्छाव
सौ.सायली ताई देशमुख यांच्या मुक्रमाबाद येथील शिव कथेला भाविकांची अलोट गर्दी
मुक्रमाबाद प्रतिनिधी /बस्वराज स्वामी वंटगिरे
शिव कथेतील शिव पार्वती विवाह सोहळा उत्साहात महादेव -श्री कैलास आवडके व पार्वती -सौ.सुजाता आवडके यांना शिव पार्वती होण्याचा योग मिळाला महादेव पार्वती चे मामा म्हणुन सुभाष आप्पा बोधने व सुरेश सावकार पंदिलवार यांनी उपस्थित होते
श्री शिव महा पुराण कथा यज्ञ सोहळा मुक्रमाबाद(खडकेश्र्वर)श्री इच्छापूर्ती गणेश मंदिर व श्री तुळजाभवानी मंदिर तेरावा वर्धापन दिनानिमित्त आयोजक .-श्री शिवाय नमस्तुभ्यं सेवा संघ खडकेश्वर
संयोजक -आवडके ज्वेलर्स.
कथाकार- ह. भ. प .सौ. सायली ताई सुशांत देशमुख.( शिवणे पुणे.) युवा किर्तनकार कथाकार सौ.सायली ताई शिव कथेच्या तिसऱ्या दिवशी च्या शिव कथेतील सती खंड
शिव महा पुराणातील रुद्र संहिता या संहिता मध्ये दुसरा खंड सती खंड म्हणून ओळखला जातो या खंडात 43 अध्याय आहेत.पार्वती खंड शिव महा पुराणातील रुद्र संहिता या संहिता मध्ये तिसरा खंड पार्वती खंड म्हणून ओळखला जातो.या खंडात 55 अध्याय आहेत.रुद्र संहिता खंड शिव महा पुराणातील रुद्र संहिता या संहिता मध्ये पाच खंड आहेत.पहिल्या खंडात 20 अध्याय आहेत.
चौथ्या खंडाला कुमार खंड म्हटले जाते आणि या खंडात 20 अध्याय आहेत.
पाचव्या खंडाला युद्ध खंड म्हटले जाते आणि या खंडात 59 अध्याय आहेत.
श्री शिव महा पुराण तील रुद्र संहिता. त्यातील सृष्टी खंड सती खंड पार्वती खंड या विषयांवर अतिशय सुंदर पद्धतीने भक्तांना भक्तिचा ज्ञानार्जन करण्यासाठी योग्य प्रकारे मार्गदर्शन केले. त्याचबरोबर समस्त ग्रामस्थांच्या उत्साहामध्ये शिव पार्वतीचा दिव्य भव्य असा विवाह सोहळा अतिशय थाटात पार पडला.