आशाताई बच्छाव
सोनई महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा
सोनई, ता. २८ कारभारी गव्हाणे प्रतिनिधी: मुळा एज्युकेशन सोसायटीचे, कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ. शंकर लावरे व प्रमुख अतिथी म्हणून महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी सन फार्म इंडस्ट्री, अहिल्यानगर येथील सिनिअर एक्झीकेटिव्ह श्री. राहुल घावटे उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्याना जीवनात यशस्वी होण्यासाठी विज्ञान व तंत्रज्ञान तसेच माहिती तंत्रज्ञानाचा कसा उपयोग होतो या संबंधी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. सी.व्ही. रमन यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलनाने झाली. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक डॉ. हरिश्चंद्र सडेकर यांनी केले. त्यांनी कार्यक्रमाची रूपरेषा व रमन इफेक्ट या बद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. पाहुण्यांचा परिचय प्रा. बाळासाहेब शिंदे यांनी करून दिला. उपप्राचार्य डॉ. ज्ञानदेव झिने, डॉ. अशोक तुवर, डॉ. राजू दारकुंडे यांनी विद्यार्थ्यांना विज्ञान दिनाचे महत्व विषद केले. अध्यक्षीय भाषणात डॉ. शंकर लावरे यांनी विद्यार्थ्यांना विज्ञान व संशोधन या विषयी माहिती दिली. विज्ञान दिनानिमित्त महाविद्यालायात विज्ञान व नाविन्यता या विषयावर ऑनलाईन प्रश्नमंजुषा स्पर्धा, निबंध स्पर्धा, प्रयोगशाळा साहित्य प्रदर्शन स्पर्धा , रील स्पर्धा इ. स्पर्धा घेण्यात आल्या. यशस्वी विद्यार्थ्यांना पाहुण्यांच्य हस्ते प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. महाविद्यालायात एकूणच वातावरण विज्ञानमय झाल्याचे पाहून प्रमुख पाहुणे यांनी समाधान व्यक्त केले. डॉ. अनिल पवार, डॉ. राजू दारकुंडे, डॉ. राजेश वाघ, डॉ. सोपान नजन यांनी परीक्षणाचे कामकाज केले. कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ. बाळासाहेब खेडकर यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा. राहुल निपुंगे यांनी केले.






