Home उतर महाराष्ट्र श्रीरामपूरला मराठी भाषा दिन उत्साहात साजरा

श्रीरामपूरला मराठी भाषा दिन उत्साहात साजरा

112

आशाताई बच्छाव

1001278712.jpg

श्रीरामपूर दिपक कदम तालुका प्रतिनिधी -डि. पॉल इंग्लिश मेडियम हायस्कूल, श्रीरामपूर शाळेत आज दिनांक २७ फेब्रुवारी २०२५ मराठी भाषा अभिजात दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. इयत्ता पाचवी तुकडी ब. या वर्गातील मुलानी मराठी भाषा दिन . परिपाठ सा सादर केला, मराठी साहित्यातील, विविध प्रकार नाटिके द्वारे सादर करण्यात झाले. रेह फादर फैन्को शाळेचे व्यवस्थापक यांनी मुलांना मराठी भाषादिनाच्या शुभेच्छा दिल्या त्यांनी आपल्यामराठी मध्ये व्यक्त के ल्या . शाळेच्या मुख्याध्यापिका सिस्टर सेलिन यांनी देखील मराठा भाषा दिनाच्या मुलांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनुराधा कपिले मॅडम यानी केले. स्नेहल ने वेवाणी यांनी मराठीभाषेला अभिजात दर्जा का मिळाला साविषयी माहिती दिली तसेच सर्वांनी मराठी असल्याचा अभिमान बाळगावा असे आवाहन केले त्यानंतर मालन मोहन यांनी वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रগ यांचे मराठी भाषेतील योगदान याविषयी माहिती सांगितली, सुनयना भालेराव , स्वाती घोरपडे’ माय मराठी’ गीत सादर केले श्रुती हिंगे ( इयत्ता ३री )या चिमुकलीने शिवगर्जना दिली कार्यक्रमाचे सर्व नियोजन अनुराधा कपिले, स्नेहल नेववाणी व मालन मोहन यांनी शाळेच्या मुख्याध्यापिका सिस्टर सेलिन यांच्या मार्गदर्शना खाली केले गेले .