Home उतर महाराष्ट्र सोनई महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा..

सोनई महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा..

180

आशाताई बच्छाव

1001278647.jpg

सोनई महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा..  अहिल्यानगर, कारभारी गव्हाणे प्रतिनिधी –काल मुळा एज्युकेशन सोसायटीचे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सोनई या महाविद्यालयामध्ये मराठी विभाग अंतर्गत कविवर्य कुसुमाग्रज उर्फ विष्णू वामन शिरवाडकर यांचा जन्मदिवस हा मराठी भाषा गौरव दिन म्हणून २७ फेब्रुवारी २०२५ रोजी साजरा करण्यात आला. कविवर्य कुसुमाग्रज उर्फ विष्णू वामन शिरवाडकर यांच्यासारख्या थोर लेखक साहित्यिक आणि कविवर्य यांच्या योगदानामुळे आज मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला असे प्रतिपादन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शंकर लावरे सर यांनी अध्यक्षीय मनोगतातून व्यक्त केले. महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. ज्ञानदेव झिने सर यांनी आपल्या मनोगतातून मराठी भाषेचे श्रेष्ठत्व व्यक्त केलं. तसेच इतिहास विभाग प्रमुख डॉ.संभाजी दराडे यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. निवृत्ती सोनवणे यांनी केले. तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. राहुल निपुंगे यांनी केले तर आभारप्रदर्शन डॉ. अविनाश साळवे सर यांनी केले. या कार्यक्रमासाठी प्रशासकिय अधिकारी डॉ. संदीप खेडकर,डॉ. अशोक तुवर, डॉ. जगदीश सोनवणे, डॉ.सुरेश जाधव, डॉ. हरिश्चंद्र सडेकर प्रा. बाळासाहेब शिंदे, वीरेंद्र दरंदले यांच्या समवेत अनेक प्राध्यापक व प्राध्यापकेत्तर सेवक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous articleॲड. महेंद्र गोस्वामी यांची नोटरी म्हणून नियुक्ती
Next articleवारणा नदीमध्ये प्रचंड प्रदूषण करणारे कारखाने यावर कारवाई करावी नेते बाजीराव पाटील ( नाना) यांची मागणी
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.