आशाताई बच्छाव
मुक्रमाबाद येथील जीजाई इंग्लिश स्कूल सेंटरवर श्रेयाची परिक्षा सुरळीत
मुक्रमाबाद प्रतिनिधी बस्वराज वंटगिरे
मुखेड तालुक्यातील मुक्रमाबाद येथील राठोड सर यांचे जिजाई इंग्लिश स्कूल येथील परीक्षा केंद्रावर श्रेया इंटलिजंट अकॅडमी सर्च परिक्षा २०२५ (आय.ए.एस.) दि.२३ फेब्रुवारी रविवारी सकाळी ११ ते २ या वेळेत परीक्षा शांततेत घेण्यात आले या परीक्षेत १२५ विध्यार्थी बसले होते त्यापैकी १२३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिले तर २ विध्यार्थी अनुपस्थित होते. येथील जि.प.हा.शाळेतील, जिजाई इंग्लिश स्कूलचे, कै.शि. मळगे शाळा,वंळकी,देगाव,भोसले शाळा, सरस्वती इंग्लिश स्कूल, या सर्व शाळेतील विद्यार्थी इयत्ता १ली ते ७वी चे विद्यार्थी परीक्षा दिले केंद्र प्रमुख म्हणून जिजाई इंग्लिश स्कूलचे चे संचालक जी.आर. राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली परीक्षा घेण्यात आली पर्यवेक्षक म्हणून
पी.जी .मिरगुडे , बिरादार मॅडम , प्रतिक्षा मॅडम , होमकर मॅडम , आर .एस .सोळनर ,पांचाळ मॅडम , खेंगटे मॅडम , शेळके मॅडम , सोनावणे मॅडम यांनी परिक्षेसाठी परिश्रम घेतले