आशाताई बच्छाव
भिला आहेर तालुका प्रतिनिधी
देवळा :- मेशी ता.देवळा येथे कांदा तणनाशक फवारल्याने नुकसान झालेल्या कांदा पिकाची प्रतिएकर चाळीस हजार रुपये इंडियन पेस्टींसाईड कंपनीतर्फे मिळाली नुकसान भरपाई आमदार डॉ. आहेर यांच्या पाठपुराव्याला मिळाले यश . नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी ना. कोकाटे व आ.आहेर यांचे मानले आभार कृषीमंत्री ना. माणिकराव कोकाटे व आमदार डॉ. राहुल आहेर यांचे हस्ते शिवजयंतीच्या दिवशी धनादेश वाटप करण्यात आले.
मेशी ता. देवळा येथे ५४ शेतकऱ्यांनी कांदा पिकावर इंडियन पेस्टींसाईड लिमिटेड कंपनीचे क्लोगोल्ड नावाचे तणनाशक कांदा पिकावर फवारल्याने जवळपास १०० एकर क्षेत्रापेक्षा जास्त क्षेत्रावर शंभर टक्के कांदा पीक खराब झाले होते जवळपास कोट्यवधी रुपयांचे नुकसान शेतकऱ्यांचे झाले होते. याबाबत नुकसानग्रस्त शेतीपिकांची आमदार डॉ आहेर यांनी पहिल्यांदा पाहणी करत कृषीमंत्री ना.कोकाटे यांचा पाहणी दौरा करत कृषी अधिकाऱ्यांकडुन पंचनामा करत संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांना नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यासाठी सूचना देत काल १९ फेब्रुवारी शिवजयंतीचे औचित्य साधत देवळा येथील शिवतीर्थाजवळ ना. कोकाटे व आमदार डॉ आहेर यांचे हस्ते नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रतिएकर चाळीस हजार रुपयांचा धनादेश यावेळी प्राथमिक स्वरूपात काही शेतकऱ्यांना देण्यात आले यावेळी प्रविण शिरसाठ, भगवान शिरसाठ, दौलत शिरसाठ, विलास बोरसे, शरद चव्हाण यांसह शेतकरी तसेच उपविभागीय कृषी अधिकारी कळवण डमाळे ,तालुका कृषी अधिकारी नलिनी खैरनार (पंचायत समिती) व संबंधित कंपनीचे अधिकारी यावेळी उपस्थित होते
दरम्यान नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी ना.कोकाटे व आ.डॉ. राहुल आहेर यांचे विशेष आभार मानले