Home जळगाव चाळीसगाव एमआयडी भागात अनोळखीचा मृतदेह आढळला

चाळीसगाव एमआयडी भागात अनोळखीचा मृतदेह आढळला

102

आशाताई बच्छाव

1001249410.jpg

चाळीसगाव एमआयडी भागात अनोळखीचा मृतदेह आढळला

चाळीसगाव प्रतिनिधी, विजय पाटील- शहराला लागून असलेल्या खडकी बुद्रूक शिवारात र्औद्योगिक वसाहत परिसरात कत्तलखाना बांधकामाच्या बाजुला आज मंगळवार दि.18 रोजी सकाळी 11.30 वाजेच्या पूर्वी अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
या अनोळखी इसमाचे वय अदंाजे 40 ते 45 वर्षे असून या इसमाचा घातपात झाला की अन्य कारणाने मृत्यु झाला हे समजून आले नाही. याप्रकरणी खडकीच्या पोलीस पाटील यांनी दिलेल्या खबरीवरून चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.दरम्यान मृत इसमाच्या डोळ्यावर इजा झाल्याचे दिसून येत आहे.
घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक किरणकुमार कबाडी.उपनिरीक्षक संदीप घुले यांच्यासह पोलीस कर्मचार्‍यांनी धाव घेत घटनेची माहिती घेतली. चाळीसगाव शहर पोलीसांनी ओळख पटविण्याचे आवाहन केले आहे. तपास उपनिरीक्षक संदीप घुले करीत आहेत.

Previous articleनामदार गिरीषभाऊ महाजन यांनी आमदार मंगेश चव्हाण यांना दिलेला शब्द खरा केला,
Next articleमालेगांवी जय शिवराय ग्रुपचा आगळा वेगळा उपक्रम-श्री शिवजन्मोत्सव नाचून नाहीतर वाचुन साजरा करण्याचा निर्धार
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.