Home नांदेड देगलूर टाइम्स लाईव्ह चे दत्त मंदिरात भव्य शुभारंभ.

देगलूर टाइम्स लाईव्ह चे दत्त मंदिरात भव्य शुभारंभ.

192

आशाताई बच्छाव

1001232741.jpg

देगलूर टाइम्स लाईव्ह चे दत्त मंदिरात भव्य शुभारंभ.

मराठवाडा विभागीय संपादक मनोज बिरादार

देगलूर शहरातील पवित्र दत्त मंदिरात पोलीस निरीक्षक मारोती मुंडे यांच्या हस्ते आरती व प्रसाद वाटपाने देगलूर टाइम्स लाईव्ह या डिजिटल माध्यमाच्या शुभारंभाचा सोहळा संपन्न झाला. या वेळी अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.
साप्ताहिक देगलूर टाइम्स चे मुख्य संपादक गजानन शेषेराव टेकाळे यांनी मागील दोन वर्षांपासून पत्रकारितेच्या माध्यमातून गोरगरीबांना न्याय मिळवून देण्यासाठी महत्त्वाचे कार्य केले आहे. हे कार्य अधिक प्रभावी आणि जलद गतीने होण्यासाठी देगलूर टाइम्स लाईव्ह या डिजिटल प्लॅटफॉर्मची सुरूवात करण्यात आली आहे.
या प्रसंगी पोलीस निरीक्षक मारुती मुंडे यांनी देगलूर टाइम्स च्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक करून नवीन डिजिटल माध्यमासाठी शुभेच्छा दिल्या. समाजातील वंचित घटकांसाठी सातत्याने काम करणाऱ्या या माध्यमाची वाटचाल अधिक यशस्वी व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. संपादक गजानन टेकाळे यांनीही गोरगरीब आणि वंचितांना न्याय मिळवून देण्यासाठी गेली दोन वर्षे आम्ही कार्यरत आहोत. आता हेच कार्य अधिक प्रभावीपणे करण्यासाठी डिजिटल माध्यमातून देगलूर टाइम्स लाईव्ह सुरू केले आहे, असे सांगत समाजहितासाठी सतत कार्यरत राहण्याचा निर्धार व्यक्त केला.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून देगलूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मारोती मुंडे, दत्त मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा सेवावृत्त सहायक पोलिस निरीक्षक व्यंकटेश रनवीरकर, राष्ट्रवादीचे युवा जिल्हा कार्याध्यक्ष विक्रम नागशेटिवार, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख महेश पाटील आणि देगलूर टाइम्स चे कार्यकारी संपादक शेख असलम, संतोष मनधरणे, अनिल पवार, मनोज बिरादार धनाजी जोशी, अमोल कुमारशिंदे, रियाज अत्तार, नागेश पलपवार, गजानन शिंदे आदी उपस्थित होते.
‌ उपस्थित सर्व मान्यवरांचा यथोचित सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संपादक गजानन टेकाळे यांनी केले, तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिलिंद वाघमारे यांनी केले व देगलूर टाइम्स लाईव्ह चे तालुका प्रतिनिधी धनाजी देशमुख यांनी आभार प्रदर्शन केले.

Previous articleनगरपरिषदांच्या अग्निशमन यंत्रणेसाठी ट्रीपल लेअरचे फायर प्रॉक्झिमिटी सूटचे वाटप.
Next articleमोखाड्यामध्ये दीपक फाऊंडेशन व दीपक नायट्रेट मार्फत संगाथ प्रकल्प प्रसार कार्यशाळा संपन्न
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.