आशाताई बच्छाव
राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसीच्या प्रदेश सरचिटणीस पदी गंगाधरराव भांगे यांचे नियुक्ती.
मराठवाडा विभागीय संपादक मनोज बिरादार
देगलूर –हॉटेल सेंट्रल पार्क पुणे येथे आयोजित केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी विभागाची राज्यस्तरीय बैठक संपन्न झाली.. यावेळी महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार सुनिल तटकरे साहेब प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी विभागाचे अध्यक्ष कल्याण राव आखाडे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा सौ रुपाली ताई चाकणकर महाराष्ट प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सरचिटणीस आमदार शिवाजीराव गर्जे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी उपस्थित राहून संपूर्ण महाराष्ट्रातून आलेल्या पदाधिकारी कार्यकर्ते यांना मार्गदर्शन केले व आगामी काळात येणाऱ्या निवडणुकीत पक्षाची ताकद वाढवण्यासाठी सुचना केल्या. यावेळी नांदेडचे ओबीसी नेते म्हणून ओळखले जाणारे मा. गंगाधरराव भांगे सर यांची प्रदेश सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात येऊन पत्र देण्यात आले.
यावेळी घोगरे पाटील शहराध्यक्ष नांदेड, बच्चू यादव ओबीसी नांदेड, डांगे आनंदराव ओबीसी जिल्हाध्यक्ष भोकर, पांडुरंग राजुरे सरपंच चाकूर, तालुका उपाध्यक्ष, मलिकार्जुन कडलवार देगलूर शहर उपाध्यक्ष, डॉ. तोडके नांदेड, स्वरा मराठे महिला उपाध्यक्ष नांदेड आदीची उपस्थिती होती. या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देगलूर च्या वतीने दिनांक 11 फेब्रुवारी रोजी तालुकाध्यक्ष राहुल देसाई देगावकर, शहराध्यक्ष देवेंद्र मोतेवार, यांच्या अध्यक्षतेखाली सत्कारांचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यावेळी उपस्थित पत्रकार बांधवांचा सत्कार करण्यात आला. भांगे सरांनी ओबीसी आणि सर्व समाजातील दुर्लक्षित घटकांसाठीच्या पक्षाच्या आणि सरकारच्या योजना राबवण्यासाठी नक्कीच प्रयत्न करू असे आश्वासन दिले. कार्यक्रमास सर्व पदाधिकारी यांची आवर्जून उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक कांबळे यांनी केले तर आभार राहुल देसाई यांनी व्यक्त केले.