आशाताई बच्छाव
मुक्रमाबाद येथील जिल्हा परिषद हायस्कूल येथे शिष्यवृत्ती परीक्षा सुरळीत
मुक्रमाबाद प्रतिनिधी बस्वराज वंटगिरे
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे द्वारा घेतल्या जाणाऱ्या पुर्व उच्च प्राथमिक व माध्यमिक परीक्षा मुखेड तालुक्यातील मुक्रमाबाद येथील जिल्हा परिषद हायस्कूल मध्ये इयत्ता पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षा शांततेत पार पडल्या या परीक्षेत पुर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (२०२५) ५ वी च्या एकुण १५० विध्यार्थी परीक्षेला बसले होते त्यापैकी १३७ विध्यार्थी परीक्षा दिले असुन १३ विध्यार्थी अनुपस्थित होते पुर्व उच्च माध्यमिक व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा केंद्रावर केंद्रसंचालक म्हणून मदने एस.जी.हे अतीशय उत्कृष्ट रीतीने आपले काम पाहिले यावेळी बैठे पथक म्हणून लाळे सर, वाघमारे सर यांच्या मार्गदर्शनाखाली परीक्षा सुरळीत पार पडली पर्यवेक्षक म्हणून ढगे व्ही.सी,बिरादार ए.पी, पाटील एम.यु, पाटील पी.ए,अंकलवार पी आय,गुरमे एस.बी,नेलगे एस.के.यांनी काम पाहिले. अनुचित प्रकार घडु नये म्हणून पोलिस ठाणे मुक्रमाबाद येथील पोलिस सहाय्यक पोलीस निरीक्षक भालचंद्र तिडके यांच्या मार्गदर्शनाखाली तग्याळकर व नरबागे सर यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.






