आशाताई बच्छाव
“युवा मराठा”चे राजेंद्र पाटील राऊत यांना “शिवहिंद समाज रत्न पुरस्कार” जाहीर!
मालेगाव:- युवा मराठा न्यूजपेपर्स अँन्ड वेब न्यूज चॅनलचे मुख्य संपादक,मालक तथा युवा मराठा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष व आश्रयआशा फाऊंडेशन व-हाणे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र पाटील राऊत यांना मालेगाव येथील जय शिवराय या सामाजिक ग्रुपच्या वतीने दिल्या जाणाऱ्या “शिवहिंद समाजरत्न” पुरस्कारासाठी निवड करण्यात आली असून,सदरचा पुरस्कार २६ जानेवारी रोजी एका विशेष समारंभातून बहाल केला जाणार आहे.
राजेंद्र पाटील राऊत तथा भाऊ यांची कारकीर्द तशी सोपी कधीच नव्हती.अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे जन्म झालेल्या राजेंद्र पाटील राऊत यांच्या बालपणीच पितृछत्र हरपल्याने त्यांचे संपूर्ण बालपण व उर्वरित वास्तव्य हे नाशिकच्या मालेगावजवळील कौळाणे या गावात गेले.परिस्थितीशी लढत झगडत , लोकांचे शेतीकामात मोलमजुरी करून आयुष्याची खडतर वाटचाल तुडवत असताना राजेंद्र पाटील राऊत (भाऊ) यांनी स्व-बळावर श्रीमती आशाताई बच्छाव यांच्या सहकार्य व मार्गदर्शनाखाली युवा मराठा न्यूजपेपर्स अँन्ड वेब न्यूज चॅनलची आणि युवा मराठा महासंघ, आश्रयआशा फाउंडेशन या संस्थेची व-हाणे गावी स्थापना करुन आजही अनेक सामाजिक कामे केलीत व आजही करीतच आहेत म्हणून त्याचीच हि पावती म्हणून आज रोजी राजेंद्र पाटील राऊत यांना या पुरस्काराने सन्मानित केले जात आहे.