आशाताई बच्छाव
बहापुरा शेत शिवार रेल्वे ट्रॅकच्या दक्षिण बाजुला अनोळखी मृतदेह आढळला. ओळख पटवण्याचे आव्हान…!
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलडाणा :-मलकापूर रेल्वे ट्रकमॅन निलेश राजाराम ढोले वय ३६ वर्ष रा. माता महाकाली नगर, मलकापूर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार बहापुरा शेत शिवार रेल्वे ट्रकच्या दक्षिण बाजुला एक अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आला आहे. मृतकाचे वय अंदाजे ३० ते ३५ वर्ष असून त्याचा रंग निमगौरा, बांधा मजबुत, उंची अं. ५ फुट ५ इंच, चेहरा गोल, डोक्यावरील केस काळे व दाट, अंगामध्ये कथिया रंगाचे फुल बाहीचे टिशर्ट ज्यावर इंग्रजीमध्ये TOMMY JEANS लिहलेले व कधिया रंगाचा फुल पॅन्ट, दाढी बारीक, मुछ बारीक व काळी, डाव्या हातमध्ये स्पोर्ट टाईप घडयाळ, उजव्या हातामध्ये मधले बोटामध्ये साधी अंगठी आहे. याप्रकरणी पोलीस स्टेशन मलकापूर शहर येथे मर्ग क्र. ०१/२०२५ कलम १९४ नोंदविण्यात आली असून वरील वर्णनाच्या इसमाला कोणी ओळखत असल्यास पोलीस निरीक्षक गणेश गिरी ७३८७०४११११, सपोनि ईश्वर वर्ग ९३०९१००९२२, पोलीस स्टेशन मलकापूर शहर ०७२६७-२२२०१८ यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.