Home उतर महाराष्ट्र राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५३ शेवाळी फाटा ते साक्री या महामार्गावरील निजामपुर- जैताणें...

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५३ शेवाळी फाटा ते साक्री या महामार्गावरील निजामपुर- जैताणें गावातुन जाणाऱ्या महामार्गासाठी विविध समस्यांच्या विरोधात दिले बांधकाम विभागास निवेदन…..

180

आशाताई बच्छाव

1001102317.jpg

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५३ शेवाळी फाटा ते साक्री या महामार्गावरील निजामपुर- जैताणें गावातुन जाणाऱ्या महामार्गासाठी विविध समस्यांच्या विरोधात दिले बांधकाम विभागास निवेदन…..

धुळे/साक्री/वासखेडी (विभागीय संपादक- दिपकभाऊ जाधव)- येथील माळमाथा परीसरातील सगळ्यात मोठे बाजारपेठेचे केंद्रबिंदू म्हणुन ओळखले जाणारे शहर म्हणून जैताणे शहराची ओळख आहे या जैताणे -निजामपुर शहरातुन राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५३ शेवाळी फाटा ते नंदुरबार जात असुन या ठिकाणी विविध समस्यांच्या निराकरण करण्यासाठी जैताणे शहराचे भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष श्री दशरथ शेलार व श्री,आनंदा दशरथ सोंजे आणि सौ, सोनाली बाजीराव पगारे,पंचायत समितीच्या सदस्या यांच्या प्रमुख उपस्थितीत देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की,निजामपुर- जैताणे या गावातुन जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५३ चे काम चालू असुन कामाची गुणवत्ता चांगली नसुन शासन आदेशानुसार कुठलेही काम दिसत नाही, संबंधित कामाचे ठेकेदार आपल्या मनमानी पद्धतीने व दमदाटीने काम करित आहेत,जैताणे गावात माळमाथा परीसरतील मुख्य बाजारपेठ असुन आठवड्यात दर सोमवारी बाजाराचा दिवस असतो, यादिवशी बाजार भरण्या करिता असंख्य अडथळे निर्माण होऊन रहदारीच्या बेशिस्तीमुळे अपघाताची दाट शक्यता नाकारता येत नाही, म्हणुनच कामाची गुणवत्ता व शासनाने दिलेल्या ईस्टिमेट नुसारच काम झाले पाहीजे,तसेच आमच्या प्रमुख मागण्या गावातील संपूर्ण रस्त्यावर मध्यभागी डिवायडर आणि वासखेडी,खुडाणे, आखाडे तसेच धुळे व लामकानी येणाऱ्या वाहनांसाठी आदी ठिकाणी चौफुलीवर गोल सर्कल असणे गरजेचे आहे,व शाळेतील मुलांच्या दृष्टीने रस्त्याच्या दोन्हीही बाजुला साईड सरळ साईड पट्टी आसावी या प्रमुख मागण्या दिलेल्या निवेदनात करण्यात आल्या आहेत, वरील मागण्यांसाठी काही काळ काम बंद करण्यात आले होते,अडचणी व गैरसोयीचे निवारण न झाल्यास कायदेशीर या कामाचे ठेकेदारच याला जबाबदार राहील असे ही निवेदनात म्हटले आहे,
या कामबंद असलेल्या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता श्री भालचंद्र बोरसे यांनी दिलेल्या मागणीचे निवेदन स्विकारत लेखी आश्वासनाने काम पुर्ववत सुरू करत निवेदन स्विकारले, यावेळी निवेदनावर श्री आनंदा सोनजे भारतीय जनता पार्टी जैताणे शहर उपाध्यक्ष दशरथ शेलार भारतीय जनता पार्टी जैताणे शहर अध्यक्ष सोनाली बाजीराव पगारे प स सदस्य ग्रामपंचायत सदस्य संभाजी महाले ,राकेश शेवाळे समाजीक कार्यकर्ते ,केवडा मोरे, मगन जाधव, किरण बाबा ,पंकज पगारे, कुष्णा ठाकरे ,गुलाब न्याहाळदे, सदा महाजन ,व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते,सावंत कन्स्ट्रक्शन चे ई.सागर निकुंभ यांवेळी उपस्थित होते, सकाळपासून निजामपूर पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक मयुर भामरे यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना सोबत घेत चांगला चोख बंदोबस्त ठेवला होता…

Previous articleभंडारा जिल्ह्यातील नैसर्गिक पर्यटण स्थळ बंद ठेवण्याचे निर्देश
Next articleसार्वजनिक ठिकाणी जनावरे बांधणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.