आशाताई बच्छाव
चाळीसगावात जुगार खेळणार्या 32 जणांंवर कारवाई
चाळीसगाव प्रतिनिधी विजय पाटील- चाळीसगाव शहर पोलीसांनी शहरातील शिवाजी घाट परिसर तसेच स्टेशन रोड परिसरात लपून छपून जुगार खेळणार्या अड्ड्यांवर छापा टाकून 32 जणांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून 29 हजार 775 रूपयांची रोकड जप्त करण्यात आली. या कारवाईने जुगार खेळणार्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, चाळीसगाव शहरातील शिवाजी घाट तसेच स्टेशन रोड परिसरात लपून छपून अवैधरित्या जुगार खेळला जात असल्याची माहिती पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना मिळाली. माहितीची खातरजमा केल्यानंतर
उपनिरीक्षक योगेश माळी, हवालदार राहूल सोनवणे, प्रविण जाधव, अजय पाटील, विनोद पाटील, पोकॉ. रविंद्र बच्छे, अमोल भोसले यांच्या पथकाने या ठिकाणी छापा टाकून 32 जणांना जुगार खेळतांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 29 हजार 775 रूपये रोख व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले. या आरोपीतांवर कायदेशीर करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक यांनी दिली.






