आशाताई बच्छाव
केंद्रीय मंत्री शाह यांच्या वक्तव्याचा निषेध; बसपाचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने नेवासा -अहिल्यानगर कारभारी गव्हाणे प्रतिनिधी
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संविधानावरील चर्चेदरम्यान राज्यसभेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावरुन केलेल्या वक्तव्याचा बहुजन समाज पक्षाच्या वतीने मंगळवार जिल्हाधिकारी कार्यालया समोर निदर्शने करुन निषेध नोंदविला. केंद्रीय मंत्री शाह यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी गृहमंत्री शाह यांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा व बहुजन समाजाची जाहीर माफी मागावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.
या आंदोलनात बहुजन समाज पक्षाचे जिल्हा प्रभारी सुनील ओहोळ, राजू खरात, जिल्हा उपाध्यक्ष शहानवाज शेख, जिल्हा महासचिव मेजर राजू शिंदे, उत्तर जिल्हा महासचिव प्रकाश अहिरे, सलीम अत्तार, राहुरी विधानसभेचे अध्यक्ष संजय संसारे, सुनील मगर, नितीन जावळे, शहर प्रभारी गणेश बागल, रवी कुमार आदी उपस्थित होते.






