Home जळगाव डॉ.सौ.प्रमिलाताई पूर्णपात्रे प्राथमिक विद्यालयात गणित दिवस साजरा

डॉ.सौ.प्रमिलाताई पूर्णपात्रे प्राथमिक विद्यालयात गणित दिवस साजरा

122

आशाताई बच्छाव

1001076606.jpg

डॉ.सौ.प्रमिलाताई पूर्णपात्रे प्राथमिक विद्यालयात गणित दिवस साजरा

चाळीसगाव प्रतिनिधी विजय पाटील- डॉ.सौ.प्रमिलाताई पूर्णपात्रे प्राथमिक विद्यालय, चाळीसगाव येथे महान गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंतीनिमित्त २२ डिसेंबर जागतिक गणित दिवस साजरा करण्यात आला. यावेळी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक रमेश सोनवणे सर होते. सोबत ज्येष्ठ शिक्षक राजेंद्र वराडे आदी उपस्थित होते. मुख्याध्यापक रमेश सोनवणे यांनी श्रीनिवास रामानुजन यांच्या प्रतिमेचे पूजन करून आदरांजली वाहिली.
गणित दिनानिमित्त इ.४थी ते ७वीच्या विद्यार्थ्यांनी गणितातील संबोध, सूत्रे व गणितीक्रिया सोप्या पद्धतीने समजण्यासाठी विविध प्रकारचे सुमारे ७० माॅडेल्स बनविली होती. व रांगोळी स्पर्धेत विविध भौमितिक आकारातील रांगोळी व गणितीय रचना असलेल्या रांगोळ्या यावेळी विद्यार्थ्यांनी साकारल्या. व त्यांची पाहणी मुख्याध्यापक रमेश सोनवणे व ज्येष्ठ शिक्षक राजेंद्र वराडे सर यांनी केली व याबाबत विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
सूत्रसंचालन देवेंद्र दाभाडे यांनी केले तर आभार श्रीमती.पुनम पाटील यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी योगेश साळुंखे व श्रीमती.मोनाली पाटील सर्व शिक्षक बंधू-भगिनी व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

Previous articleखाकी फायर है! ‘एसपींच्या नेतृत्वात सहा कोटी 98 लाख 73 हजार 3002 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत !’
Next articleभोरस फाट्याजवळ दोघांना मारहाण – चार जणांवर गुन्हा
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.