आशाताई बच्छाव
माहोरा येथील संजय गणपत काळे यांचे अल्पशा आजाराने निधन
तालुका प्रतिनिधी जाफराबाद- मुरलीधर डहाके
दिनांक 21/12/2024
जाफराबाद तालुक्यातील माहोरा येथील कै.संजय गणपत काळे यांचे दिनांक 21 वार शनिवार 11 वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांचेवर संध्याकाळी सात वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्य संस्कार साठी माहोरा परिसरातील तसेच तालुक्यांतील नागरीक आणि नातेवाईक मोठया प्रमाणात उपस्थित होते. त्यांचा स्वभाव मनमिळाऊ आणि कोणाचाही सुख दुःखत धावून जाणारे व्यक्तिमत्व होतं. त्यांच्या पश्चात आई,पत्नी,एक मुलगा,एक मुलगी,तीन भाऊ, दोन बहीणी असा त्यांचा मोठा परिवार आहे.असे व्यक्तिमत्व हरवल्यामुळे माहोरा परिसरातून तसेच जाफराबाद तालुक्यातून त्यांच्या जाण्याने हळहळ व्यक्त होत आहे.