आशाताई बच्छाव
!गडचिरोलीतील गोर गरिबांचा कैवारी पडद्यामागील गरिबांचा असल, हिरो हिरानंद भाई राठी!..!
!गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम भागातील गोरगरीब नागरिकांना तीन लाखांचे वस्त्रदान करणारे ग्रेट व्यक्तिमत्व हिरानंद भाई राठी! गडचिरोली सुरज गुंडमवार ब्युरो चीफ
गडचिरोली शहरात गेल्या अनेक वर्षापासून राहणारे आणि महेश स्पोर्ट शॉप चालवणारे हीरानंद भाई राठी, गेल्या अनेक वर्षापासून गोरगरिबांना वस्त्रांचे दान करीत आहे ,परंतु या हाताने देणे आणि त्या हाताला माहिती न होऊ देणे त्यांचे असेच सुरू आहे ,कधीही याबाबतीत कुणालाही साधी माहिती होऊ दिली नाही, मीडियापासून दूर राहून आपल्या नावाचा व कार्याचा कधीच त्यांनी गवगवा होऊ दिला नाही ? आणि त्यांचे काम त्यांनी सुरू ठेवलेआहे,नुकताच राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे वतीने संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष डॉक्टर प्रणय भाऊ खुणे, प्रदेश उपाध्यक्ष राहुल भाऊ झोडे, जिल्हा अध्यक्ष रमेश अधिकारी यांनी त्यांची भेट घेतली आणि दिलखुलास चर्चा केले, यावेळी हिरानंद भाई राठी यांनी राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेला गोरगरिबांना वाटण्यासाठी आज तीन लाख रुपयाचे रेडिमेड वस्त्र दान दिले आणि आपल्या दानशूर पणाचा परिचय दिला, त्यांनी बोलताना सांगितले आजपर्यंत गडचिरोली जिल्ह्यातील अनेक ठिकाणी त्यांनी अशा प्रकारचे वस्त्र दान केले आहे आणि नेहमी ते वस्त्र दान करण्याचे सत्कार्य करत असतात परंतु कोणाला माहिती होऊ देत नाही
मारवाडी समाजातील, असल हिरा,हिरानंद भाई देवाला मानणारे आणि नेहमीच ,भक्ती भावनेत जीवन जगणारे व जास्तीत जास्त वेळ धार्मिक कार्यात स्वतःला वाहून घेणारे , तसेच देशभरातील विविध धार्मिक स्थळांना भेट देऊन आशीर्वाद प्राप्त करुन, सुख शांतीने जीवन व्यतित करणारे हिरानंद भाई व्यवसाय करत असताना या व्यवसायाच्या माध्यमातून मिळणाऱ्या मिळकतीतून काही अंश सर्वसामान्य गोरगरिबांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी प्रामुख्याने वस्त्रांचा दान करण्यासाठी नेहमी सज्ज असतात, राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या वतीने सलाम अशा व्यक्तिमत्वाला, सलाम अशा पडद्यामागील हिरोंना, खरोखरच आज सुद्धा त्यांनी फोटो घेण्यास, माहिती मीडियात देण्यास नकार दिला होता व त्यांनी हा विषय कुणासही वाच्यता करण्यास नकार दिला होता, परंतु अशा दानशूर व्यक्तिमत्त्वाचा खरोखरच समाजात गौरव होणे गरजेचे आहे !खरोखरच हिराभाई तुम्ही ग्रेट आहात,आणि खरोखरच आजच्या या काळात तुम्हीच पडद्यामागील असल हिरो आहात ?आपणास व आपल्या कुटुंबीयास राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या वतीने सलाम व खुप खूप धन्यवाद हिरानंद भाई सचमुच आप ग्रेट हो, और परदे के पीछे के असल हिरो हो