Home नांदेड आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्थेचे स्वप्न झाले साकार!

आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्थेचे स्वप्न झाले साकार!

55
0

आशाताई बच्छाव

1001058010.jpg

आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्थेचे स्वप्न झाले साकार!
मराठवाडा विभागीय संपादक मनोज बिरादार
नांदेड –आम्ही वारकरी सेवाभावी संस्था नांदेड महाराष्ट्र राज्य या संस्थेच्या वतीने दिनांक 16 डिसेंबर 2024 सोमवार रोजी पंढरपूर येथे श्री सुभाष मोतीचंद शहा यांच्याकडील पंढरपूर नगरपालिका क्षेत्रातील एन. ए. झालेला
2000 स्केवर फूटचा प्लॉट धर्मशाळा बांधण्यासाठी
आज खरेदी करण्यात आला.या जागेची पाहणी व कागदपत्र तपासणीसाठी श्री नारायण जोशी साहेब,श्री भास्कर अण्णा रेडी, श्री गंगाराम पांगरेकर, श्री उत्तमराव बोपेवार सर,राहुल महाडिक,नितीन कौलवार यांचे मार्गदर्शन लाभले. आजच्या रजिस्ट्रीसाठी आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राम महाराज पांगरेकर,संस्थापक सचिव व्यंकट महाराज जाधव माळकौठेकर, कोषाध्यक्ष शिवाजी मदमवाड व संस्थेचे सर्व संस्थापक सदस्य यांची उपस्थिती होती. त्याचबरोबर संस्थेला ज्यांचं नेहमी मार्गदर्शन लाभत असे आमचे आदरणीय रावसाहेब पा.शिराळे ,दत्तराम पा. एडके,रामजी पा. शिंदे,दत्तरामजी गोरठेकर तसेच संस्थेचे सल्लागार गंगाधर पा. भरकडे,शिवाजी पांगरेकर महिला आघाडीच्या माता भगिनीं, तसेच नांदेड जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील तालुकाध्यक्ष,सचिव,उपाध्यक्ष सर्व सदस्य आपल्या परिवाराचा प्रचार आणि प्रसार करणारे मल्टीमीडिया चे अध्यक्ष गणेश पा.पवार विशेष म्हणजे आम्ही वारकरी परिवार नांदेडसह महाराष्ट्रभर पोहोचवण्याचं काम ज्यांनी केलं असे आमचे आदरणीय जिल्हा प्रसिद्धीप्रमुख चंपतराव डाकोरे पा.उपस्थित होते.या जागेसाठी अहोरात्र परिश्रम घेणारे,जागेसाठी देणगी जमा करणारे जिल्हा व राज्यभरातून साधारणत: 150 च्या वर सदभक्त उपस्थित होते. आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्थेच्या या कार्याचे समस्त जिल्हाभर व महाराष्ट्रभर कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here