Home जळगाव वाकडी येथे संजय गरुड महाविद्यालयात जागतिक अपंग दिनानिमित्त अपंग विद्यार्थ्यांचा सत्कार व...

वाकडी येथे संजय गरुड महाविद्यालयात जागतिक अपंग दिनानिमित्त अपंग विद्यार्थ्यांचा सत्कार व खाऊचे वाटप

93

आशाताई बच्छाव

1001014155.jpg

वाकडी येथे संजय गरुड महाविद्यालयात जागतिक अपंग दिनानिमित्त अपंग विद्यार्थ्यांचा सत्कार व खाऊचे वाटप

अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतिकारी सामाजिक संघटनेचा पुढाकार

जळगाव( संजीव भांबोरे)जामनेर तालुक्यातील वाकडी येथील संजय गरुड महाविद्यालयात आज दिनांक ३ डिसेंबर 2024 ला दुपारी २ वाजता जागतिक अपंग दिनानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. व खाऊचे वाटप करण्यात आले. यावेळी अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतिकारी सामाजिक संघटनेचे जळगाव जिल्हाध्यक्ष सुधाकर सिंगारे व महिला उपजिल्हा प्रमुख ममता राजपूत यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते .यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका पी. एन. पाटील व सहाय्यक शिक्षक के .पी .गरुड यांनी अपंगाचे आभार मानून त्यांना सहकार्य करण्याची प्रेरणा दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक पाटील यांनी केले. तर आभार आर एस चौधरी यांनी मानले . कार्यक्रम यशस्वी करण्याकरता विजय राजपूत, एकनाथ कोळी, परमेश्वर चौधरी, शब्बीर तडवी, विलास देशमुख, गणेश पाटील ,गणेश सोनवणे, सुधाकर जाधव, सुनील जाधव ,यांनी सहकार्य केले.याप्रसंगी शाळेतील सर्व शिक्षक ,शिक्षिका व कर्मचारी उपस्थित होते .

Previous articleसुखलालजी कुंकलोळ यांचे निधन
Next articleशिक्षण महर्षी नंदलाल पाटील कापगते यांच्या 23 व्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन….
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.