Home Breaking News पेणमध्ये शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे ) यांचे शक्ती प्रदर्शन ! प्रस्थापितांना शह...

पेणमध्ये शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे ) यांचे शक्ती प्रदर्शन ! प्रस्थापितांना शह देण्यासाठी ‘प्रसाद भोईर’ यांचा उमेदवारी अर्ज दाखल

14
0

पेणमध्ये शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे ) यांचे शक्ती प्रदर्शन ! प्रस्थापितांना शह देण्यासाठी ‘प्रसाद भोईर’ यांचा उमेदवारी अर्ज दाखल

युवा मराठा न्यूज रायगड ब्यूरो चीफ :- मुजाहीद मोमीन

पेण पाली सुधागड विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांना शह देण्यासाठी शिवसेनेचे अधिकृत उमेदवार प्रसाद भोईर यांनी माजी केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते यांच्या प्रमुख उपस्थितीत हजारो शिवसैनिकांच्या साक्षीने जोरदार शक्ती प्रदर्शन करीत आपला उमेदवारी अर्ज सादर केला.

“कोण आला रे कोण आला, शिवसेनेचा वाघ आला”, “आपकी बार प्रसाद भोईर आमदार”, “परिवर्तन घडणार, प्रसाद भोईर आमदार होणार” अशा घोषणांनी पेण शहरातील मुख्य मार्ग गाजला. हजारो कार्यकर्त्यांच्या जय घोषात निघालेल्या या रॅलीमुळे संपूर्ण शहर भगवेमय झाले होते.

सोमवारी सायंकाळी प्रसाद भोईर यांनी भाजपला जय महाराष्ट्र करीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

यावेळी शिवसेना सचिव विनायक राऊत व विधान परिषदेचे आमदार मिलिंद नार्वेकर यांनी प्रसाद भोईर यांना शिवबंधन बांधून शिवसेनेची उमेदवारी अधिकृतरीत्या जाहीर केली.

यावेळी सह संपर्कप्रमुख किशोर जैन, रायगड जिल्हा समन्वयक नरेश गावंड, उपजिल्हाप्रमुख अविनाश म्हात्रे, तालुकाप्रमुख जगदीश ठाकुर, शहर प्रमुख सुहास पाटील, विधानसभा अध्यक्ष लहू पाटील, तालुका समन्वयक दिलीप पाटील, विधानसभा समन्वयक समीर म्हात्रे, सह संपर्कप्रमुख तालुका भगवान पाटील, जिल्हा महिला संघटिका दीपश्री पोटफोडे, शेकापच्या स्मीता पाटील, वैशाली समेल, विभाग प्रमुख राजू पाटील, उप तालुका प्रमुख संतोष पाटील, विभाग प्रमुख दीपक पाटील, जीवन पाटील, युवा सेना अधिकारी योगेश पाटील, लक्ष्मण खाडे, गणेश पाटील, सुधागड तालुकाप्रमुख दिनेश चिले, गुरु थवई, युवा नेते कार्तिक जैन, काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रवीण पाटील, राष्ट्रवादीचे प्रदेश सचिव स्वरूप घोसाळकर, अच्युत पाटील, चेतन मोकल यांच्यासह शिवसैनिक हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी पेण पाली विधानसभा मतदारसंघातील रोजगार, पाणी व कृषी विषयक समस्या प्राधान्याने सोडविण्याचा मनोदय प्रसाद भोईर त्यांनी व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here