Home भंडारा तुमसर येथील शारदा विद्यालयाने मतदारांना दिला 100 टक्के मतदान करण्याचा संदेश

तुमसर येथील शारदा विद्यालयाने मतदारांना दिला 100 टक्के मतदान करण्याचा संदेश

52
0

आशाताई बच्छाव

1000902490.jpg

तुमसर येथील शारदा विद्यालयाने मतदारांना दिला 100 टक्के मतदान करण्याचा संदेश

संजीव भांबोरे
भंडारा( जिल्हा प्रतिनिधी )मी मतदार आहे,तेव्हा मतदान करून योग्य उमेदवार निवडण्याचा माझा फक्त अधिकार नसून ते माझे राष्ट्रीय कर्तव्य आणि जबाबदारी आहे. तरच मतदानाची टक्केवारी वाढू शकेल.तेव्हा मतदाराने निर्भयपणे मतदान करण्याचा निश्चय करावा.त्याच प्रमाणे इतरांना सुद्धा आपल्या देशातील लोकशाही बळकट करण्यासठी १०० टक्के मतदान करावे असे आवाहन शारदा विद्यालय व कन्या कनिष्ठ महाविद्यालय तुमसर चे प्राचार्य राहुल डोंगरे यांनी केले. यावेळी गटशिक्षणाधिकारी प्रकाश साठवणे,विस्तार अधिकारी पुष्पतोडे, रामरतन भाजीपाले उपस्थितीत होते. रॅलीतून मतदारांना आवाहन करतांना प्राचार्य राहुल डोंगरे म्हणाले की,१८ वर्षांवरील मतदार झालेल्या किंवा परिसरातील नागरिकांना मतदान करण्याकरिता जागृत करावे. त्याचबरोबर मतदान करतांना मतदार ओळखपत्र न विसरता घेवून जावे.जर मतदान ओळखपत्र नसेल तरी मतदार मतदान करू शकतात.त्यासाठी पासपोर्ट,वाहन चालक परवाना,फोटो असलेले कर्मचारी ओळखपत्र,छायाचित्र असलेले बँकाचे/टपाल कार्यालयाचे पासबुक,पॅनकार्ड,आधारकार्ड यापैकी एक ओळखपत्र असल्यास मतदान करू शकतात.महत्वाची बाब म्हणजे त्यांचे नाव मतदान यादीत असायला हवे.शासन – प्रशासनातील प्रत्येक व्यक्तीने भारतीय निवडणूक आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे आवाहन करण्यात आले. स्वीप कार्यक्रमा अंतर्गत मा.दर्शन निकाळजे उपविभागीय अधिकारी, मा. मोहन टिकले तहसिलदार यांचे विशेष मार्गदर्शनातून मतदार जागृती रॅलीने तुमसरकरांचे लक्ष वेधून घेतले.ज्योती बावनकर,दिपक गडपायले ,श्रीराम शेंडे,संजय बावनकर, नीतुवर्षा मुकुर्ने, रुपराम हरडे,विद्या मस्के,प्रिती भोयर,सीमा मेश्राम, अशोक खंगार,अंकलेष तिजारे, सुकांक्षा भुरे,बेनिता रंगारी,आरती पोटभरे, दिपक बालपांडे,नारायण मोहनकर, पुनम बालपांडे,अतुल भीवगडे, झांकेश्वरी सोनेवाणे ,उषा दाते, कल्पना मानकर,बंदिनी खैरकर,विद्या देशमुख आदींनी विशेष सहकार्य केले.

Previous articleसोनईत आनंदवन संस्थेच्या वतीने तेरा कुटुंबाची दिवाळी गोड
Next articleवसमत तालुक्यातील इंजनगाव पश्चिम येथे दोन गटात जाग्यावरून मोठावाद एकमेवर दगडफेक करून अनेक जखमी
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here