Home नाशिक सटाण्यात विधानसभेचे इच्छुक उमेदवार आकाश साळुंके यांचे बॅनर फाडले

सटाण्यात विधानसभेचे इच्छुक उमेदवार आकाश साळुंके यांचे बॅनर फाडले

280
0

आशाताई बच्छाव

1000827311.jpg

सटाण्यात विधानसभेचे इच्छुक उमेदवार आकाश साळुंके यांचे बॅनर फाडले

_कार्यकर्त्यांकडून तीव्र निषेध व्यक्त होत आहे_

सटाणा,वामन शिदे:– सध्या संपूर्ण महाराष्ट्रात निवडणूकीचे वारे वाहू लागले आहेत. प्रत्येक पक्ष आपल्या पक्षाची मोर्चे बांधणी ची तयारी करत आहेत त्यातच भारतीय जनता पार्टी आदिवासी मोर्चा चे तालुकाध्यक्ष आकाश साळूंके हे आगामी बागलाण विधानसभा निवडणुकी साठी इच्छुक उमेदवार असुन त्यांचे तालुक्यात बहुतांश गावांना शुभेच्छाचे आणि त्यांनी केलेल्या सामाजीक कार्याचे शेतकरी, विदयार्थी,आदिवासी,महिला यांच्यासाठी केलेल्या कामांची कात्रणे या बॅनरवर ठिकठिकाणी लावण्यात आले आहेत.काही समाजकंटकांना हा बॅनर सहन न झाल्याने तो फाडण्यात आला. विशेष म्हणजे सटाणा शहरातील ताहाराबाद नाका येथे लावलेला त्यांच्या बॅनर वरचा फोटो फाडण्यात आला. दरम्यान, साळुंके यांच्या समर्थकांकडुन याबाबत तिव्र संताप व्यक्त होत असुन याबाबत तक्रार दाखल करण्यात येणार असल्याची महिती त्यांनी दिली त्यामूळे बागलाण मधे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. कारण अनेक फ्लेक्स फाडले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here