Home अमरावती अमरावती शहरात धक्कादायक घटना! प्रेम प्रकरणातून त्रिकोणातून तरुणीने केली  तरुणीची हत्या.

अमरावती शहरात धक्कादायक घटना! प्रेम प्रकरणातून त्रिकोणातून तरुणीने केली  तरुणीची हत्या.

53
0

आशाताई बच्छाव

1000827186.jpg

अमरावती शहरात धक्कादायक घटना! प्रेम प्रकरणातून त्रिकोणातून तरुणीने केली  तरुणीची हत्या.
दैनिक युवा मराठा
पी. एन देशमुख
अमरावती जिल्हा विभागीय संपादक
अमरावती
अमरावती शहरात प्रेम प्रकरणात सुपर एक्सप्रेस हायवे वर घडलेल्या खून प्रकरणी मारेकरी तरुणी फरार झाली. त्रिकोणातून प्रेम प्रकरणात तरुणीने एका तरुणीची चाकूने हल्ला करून हत्या केली. ही धक्कादायक घटना मंगळवारी राजापेठ ठाण्याच्या हद्दीतील सुपर एक्सप्रेस हायवे वरील एका मंदिरा जवळ घटना घडली. घटनेनंतर मारेकरी तरुणी फरार झाली असून पोलीस तिचा शोध घेत आहे. शुभांगी वय 26 आर्वी जि. वर्धा असे मृताचे नाव आहे. शुभांगीच्या परिचयातील एका तरुणी सोबत प्रेम संबंध आहेत. त्याचे शुभांगी सोबत प्रेम संबंध असल्याचा संशय त्याच्या प्रेयसीला होता. त्या कारणावरून त्यांच्यात वाद होत होते त्यामुळे तरुणाने आपल्या प्रियसीची शुभांगी सोबत भेट घालून देण्याचा निर्णय घेतला. दरम्यान मंगळवारी शुभांगी ही एका मैत्रिणीच्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त अमरावतीत आली होती. त्यामुळे तरुणाने आपल्या प्रियसीची शुभांगी सोबत भेट घालून देण्यासाठी सायंकाळी सुमारास तिला सुपर एक्सप्रेस हायवे वरील एका मंदिराजवळ बोलाविले. शुभांगी तेथे पोचल्यावर तरुणाच्या प्रियसीने तिच्यासोबत वाद घातला. या वादात तिने शुभांगी वर चाकूने हल्ला चढविला. त्यात ती गंभीर जखमी झाली. तरुणाने शुभांगीला तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. दरम्यान घटनेची माहिती राजापेठ चे ठाणेदार पुनीत कुलट यांनी आपल्या ताब्यासह जिल्हा सामान्य रुग्णालय गाठले. पोलीस गणेश शिंदे ही तेथे पोहोचले. त्यावर पोलिसांना घटनास्थळ गाठून पंचनामा केला. पोलीस फरार झालेल्या तरुणीचा शोध घेत आहे या प्रकरणी मारेकरी तरुणाच्या प्रियकराला ताब्यात घेण्यात आले आहे. तरुणी ही दिवसा तालुक्यातील कुरा भागातील रहिवासी असल्याचे समजते.

Previous articleसौ.निर्मलाताई दानवे यांच्या हस्ते माहोरा येथे रेणुका माता मंदिरात आरती संपन्न.
Next articleविविध गटातटात विभागलेल्या आंबेडकरी गटांनी एकत्रित येऊन निवडणूक लढवावी
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here