Home नांदेड केंद्र प्रमुख आप्पाने सर यांचा आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित

केंद्र प्रमुख आप्पाने सर यांचा आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित

136

आशाताई बच्छाव

1000816264.jpg

केंद्र प्रमुख आप्पाने सर यांचा आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित

मुखेड युवा मराठा न्युज नेटवर्क बस्वराज स्वामी वंटगिरे

मुखेड तालुक्यातील मुक्रमाबाद केंद्राचे केंद्रप्रमुख आप्पाने ज्ञानेश्वर तेजेराव यांना दि. (04 अक्टो) 2024 शुक्रवार रोजी जिल्हा परिषद नांदेड यांच्या वतीने, जिल्हा गुरु गौरव आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी खासदार अशोकराव चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, शिक्षण अधिकारी (प्राथमिक) डॉ. सविता बिरगे, शिक्षण अधिकारी (माध्यमिक) माधव सलगर, तालुका गटशिक्षणाधिकारी (मुखेड) कैलास होनधरणे यांची प्रमुख उपस्थिती होती.
आप्पाने यांच्या कार्यकाळात स्पर्धा परीक्षा, विविध क्रीडा स्पर्धा, सांस्कृतिक स्पर्धा, वनभोजन, परिसर भेट, शैक्षणिक सहल, वृक्षारोपण, अंधश्रद्धा निर्मूलन, नव साक्षर अभियान राबविण्यात आले. त्याचप्रमाणे समाजाच्या सहभागातून शाळेला विविध शैक्षणिक साहित्य सहजपणे उपलब्ध करून दिले. याप्रसंगी जिल्हा गुरु गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल मा. शिक्षण सभापती व्यंकटराव पाटील गोजेगावकर, बबनराव पाटील गोजेगावकर, मा. सभापती अशोकराव पाटील रवीकर, सुरेश सावकार पंदीलवार यांच्यासह मुक्रमाबाद केंद्रातील व तालुक्यातील असंख्य शिक्षकांनी अभिनंदन व्यक्त केले. जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधिकारी, शिक्षक संघटनेचे राज्य,विभाग, जिल्हा व तालुका पदाधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते.

Previous articleवसमत विधानसभा मतदार संघात निवडणुकी पूर्वीच आरोप प्रत्यारोपाच्या फेरीत दमदाटि सुरू असल्याचे चित्र
Next articleसोयाबीनच्या गंजीला खोडसाळपणाने आग लावल्याने तीन लाखाचे नुकसान 
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.