Home गडचिरोली महिलांना उद्योजक बनवून आर्थिक सक्षम करणे हे आपले स्वप्न आमदार डॉक्टर देवरावजी...

महिलांना उद्योजक बनवून आर्थिक सक्षम करणे हे आपले स्वप्न आमदार डॉक्टर देवरावजी होळी

27
0

आशाताई बच्छाव

1000816233.jpg

महिलांना उद्योजक बनवून आर्थिक सक्षम करणे हे आपले स्वप्न

आमदार डॉक्टर देवरावजी होळी

गडचिरोली येथे महिलांचा भव्य उद्योजक मेळावा

मेळाव्याला हजारो महिलांची उपस्थिती

गडचिरोली, सुरज गुंडमवार ब्युरो चीफ 

आपण गडचिरोली जिल्ह्यामध्ये उद्योग निर्मिती व्हावी नवीन उद्योजक व्हावे यासाठी २०१७ मध्ये उद्योग क्रांती यात्रा काढून जिल्ह्यातील तरुण-तरुणींना व महिलांना उद्योजक बनविण्यासाठी काम केले . त्यातूनच आज जिल्हयात नवनवीन उद्योग येत असून त्यातून हजारो लोकांना रोजगाराच्या संधी उत्पन्न झालेल्या आहेत. जिल्ह्यातील महिलांना लखपती दीदी उद्योजक बनवून आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्याचे आपले स्वप्न असल्याचे प्रतिपादन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी गडचिरोली येथील लखपती दीदी महिला उद्योजक मेळाव्याच्या प्रसंगी केले.

यावेळी मंचावर गाव माझा उद्योग फाउंडेशनचे संस्थापक पवनजी वानखेडे, अष्टगाथा वानखेडे सहसंचालिका गाव माझा उद्योग फाउंडेशन, राजकपूर भडके रिजनल मॅनेजर वर्षाताई मोरे संपर्कप्रमुख शिवसेना (शिंदे) , यांचे सह गाव माझा उद्योग फाउंडेशनचे पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी बोलताना आमदार देवरावजी होळी म्हणाले की आपण गडचिरोली जिल्ह्यामध्ये विकासाची दृष्टी ठेवून मागील १० वर्षापासून काम करीत आहोत. जिल्ह्यामध्ये नव-नवीन उद्योग यावे या जिल्ह्यातील तरुणांना महिलांना उद्योगाची संधी मिळावी यासाठी आपण काम केले आहे. त्यातूनच कोणसरी सुरजागड सारखे मोठे लोह प्रकल्प जिल्ह्यात आलेले आहेत एमआयडीसीच्या परिसरामध्ये शेकडो नवीन उद्योजकांना आपण जागा मिळवून दिली आहे. त्यातील अनेकांचे नवीन उद्योग सुरू झाले आहेत पुन्हा नव्याने महिलांना उद्योजक बनवण्यासाठी आपण पुढाकार घेतलेला आहे आणि येत्या काळामध्ये महायुती सरकारच्या ध्येय धोरणांमुळे असंख्य नवीन लखपती दीदी तयार होतील असा मला विश्वास आहे. मी मातृ भगिनिंच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव कटिबद्ध असून आपल्या सर्व मातृ भगिनींना उद्योग मिळावे यासाठी प्रयत्न करीत आहे. मी आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे तसेच आपणही माझ्यामागे खंबीरपणे उभे राहून मला ताकद द्यावी असे आवाहन त्यांनी या प्रसंगी केले.

Previous articleआपल्या समाजामध्ये राजकीय जागरूकता असणे महत्त्वाचे आहे.- डॉ मिलिंद नरोटे
Next article_जिल्ह्यातील ओबीसींना न्याय मिळवून द्या_ _महामहीम राज्यपाल यांना भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे यांचे साकडे_
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here