Home उतर महाराष्ट्र धुळे.. जिल्हास्तरीय हॅन्डबाॅल स्पर्धेत सैनिकी शाळेचे यश

धुळे.. जिल्हास्तरीय हॅन्डबाॅल स्पर्धेत सैनिकी शाळेचे यश

178

आशाताई बच्छाव

1000811004.jpg

धुळे.. जिल्हास्तरीय हॅन्डबाॅल स्पर्धेत सैनिकी शाळेचे यश

जिल्हास्तरीय हॅन्डबाॅल स्पर्धेत सैनिकी शाळेचे घवघवित यश.
धुळे, प्रतिनिधी भाऊसाहेब निकम 
दिनांक ०१ ऑक्टोंबर २०२४ रोजी धुळे गरुड मैदानावर आयोजित हँडबॉल स्पर्धेमध्ये, इंदुबाई भदाणे प्रतिष्ठान संचलित श्री छत्रपती शिवाजी सैनिकी विद्यालयाच्या १९ वर्षे आतील हँडबॉल संघाचे यश व संघ विभागस्तरीय स्पर्धेसाठी पात्र

या सामन्यात सैनिकी शाळेतील विद्यार्थ्यी कर्णधार समाधान, सामनावीर सुनील, बेस्ट शूटर अमोल, अविनाश, जगदीश, राजकुमार, विशाल आणि गोलरक्षक लोकेश पाटील व हर्षल निकम यांनी कमालीचा खेळ दाखवत, अंतिम सामन्यात संघाला एकतर्फी विजय मिळऊन दिला व उपस्थितांची मने जिंकली, अंतिम सामन्यात सैनीकी शाळेच्या संघाने शिरपुरच्या एम. आर. पटेल शाळेच्या संघाविरुद्ध ९ गोल करत नमवले, विशेष म्हणजे अंतिम सामन्यात विरोधी संघाचा एकही गोल होऊ न देता एकतर्फी विजय संपादन केला

क्रीडा अधिकारी स्वप्नील बोंढे, जिल्हा हॅन्डबाॅल संघटना प्रमुख श्री. उदय पवार सर, आदर्श श्री. नरेश बागल सर, तसेच कार्यकारी प्रमुख श्री.निखील मोरे सर आदींनी अनमोल सहकार्य केले तसेच विजयी संघास विभागीय स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्यात.

संघाला इंदूबाई भदाणे प्रतिष्ठान चे अध्यक्ष सर
श्री. बाळासाहेब रावण भदाणे, सचिव सौ. मॅडम शालिनीताई भदाणे, प्राचार्य सर बेहेरे, उपप्राचार्य सर बाविस्कर, पर्यवेक्षक श्री.गरुड सर , श्री. एस. एन. पाटील सर, क्रीडा शिक्षक देवरे सर, बी. एम. बाविस्कर सर, सहकारी प्रशिक्षक ज्ञानेश सर, रोहित सर तसेच शाळेतील सर्व शिक्षक यांनी विजयी संघाचे व प्रशिक्षक हेमंत पाटील यांचे अभिनंदन केले व विभागस्तरीय स्पर्धेसाठी विजयी घोडदौड कायम राखण्यासाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा दिल्यात.

Previous articleजागृती फाऊंडेशन(नाशिक) आयोजित पितृपक्ष व नवरात्री विशेष अन्नदान
Next articleउमराणेत जी.पी.एस.लोकेशन आधारित पिकपहाणीचे प्रात्यक्षिक संपन्न
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.